मुक्तपीठ टीम
ज्या लोकांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरु होणार आहे. पण या प्रवासासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात आली असून ही यंत्रणा काम कशी करते, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
युनिव्हर्सल पास नेमका आहे तरी कसा?
- लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलने १५ ऑगस्टपासून प्रवास करण्यात येणार आहे.
- रेल्वे प्रवासासाठी एक विशिष्ट पास देण्यात येत आहे.
- या पासवर क्यू- आर कोड आहे.
- हा पास ‘युनिव्हर्सल पास’ म्हणून ओळखला जातो.
- हा पास लोकल ट्रेनसोबतच मेट्रो, मोनोरेल त्याचप्रमाणे मॉल किंवा इतर ठिकाणी सुद्धा चालेल.
हा पास कसा मिळवता येणार?
- राज्य सरकारकडून एक वेबसाईट तयार करण्यात आली आहे.
- ही वेबसाईट को-विनशी लिंक केली आहे.
- यामुळे व्यक्तीचे लसीकरण पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासता येणार आहे.
- ज्या व्यक्तीला पास काढायचा आहे, त्याने या वेबसाईटवर आपला मोबाईल क्रमांक एंटर करुन, मोबाईलवर आलेला ओटीपी वेबसाईटवर समाविष्ट करायचा आहे.
- त्यानंतर संबंधित व्यक्तीला आपले लसीकरण प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड करायचे आहे.
- तसंच आपला एक फोटो वेबसाईटवर अपलोड करायचा आहे.
- व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्यू-आर कोड पास(युनिव्हर्सल पास) जनरेट होईल.
- हा पास रेल्वेच्या तिकीट खिडकीवर दाखवून, तिकीट किंवा पास मिळवता येणार आहे.
- ज्या नागरिकांकडे इंटरनेटची सेवा उपलब्ध नाही किंवा ज्यांना वेबसाईट हाताळता येत नाही, अशा नागरिकांसाठी मुंबई मनपा हेल्प डेस्क सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
- त्याठिकाणी नागरीक आपली कागदपत्रे दाखवून युनिव्हर्सल पास मिळवू शकतात.
मुंबईत रेल्वे प्रवासासाठी रेल्वेपास घ्यायचाय? आधी महापालिकेचे हे नियम वाचा…