Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: कट्ट्याचा माझाला किंचित फायदा, मात्र, बुस्टर नाही! माझा, लोकमत सोडून इतर चौघांना वाट्यात काहीसा घाटा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Tv Rating

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

मराठी न्यूज चॅनल्सची १८ व्या आठवड्याची टीव्ही रेटिंग आकडेवारी समोर आली आहे. या आठवड्यातही चॅनल्सच्या स्थानांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. टीव्ही9 मराठी पहिल्या क्रमांकावरच आहे. झी २४ तास दुसऱ्या, एबीपी माझा ३ ऱ्या, साम ४ थ्या, लोकमत ५ व्या आणि लोकशाही ६ व्या स्थानावरच आहेत. या आठवड्यात पुन्हा टीव्ही 9 मराठीचा मार्केट शेअर ०.१ टक्क्याने, झी २४ तासचा ०.३ने, सामचा ०.१ ने आणि लोकशाहीचा ०.२ने कमी झाला आहे. त्याचवेळी माझाचे रेटिंग ०.३ टक्के, लोकमत ०.३ने वाढले आहेत.

माझा कट्टाचा काहीसा फायदा, पण बुस्टर नाही!

  • एबीपी माझाला ‘माझा कट्टा’ विशेष कार्यक्रमांमुळे फायदा झाला आहे, पण तो काहीसाच आहे.
  • राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्यांपासून अनेक मान्यवर कट्ट्यावर आले होते.
  • त्या कार्यक्रमांमुळे काहीसं रेटिंग वाढलं आहे. मात्र, ते चॅनलसाठी बुस्टर मात्र ठरु शकलेलं नाही.
  • गेल्या आठवड्याच्या विश्लेषणात मांडल्याप्रमाणे आता एखाद्या आठवड्यात बजावलेली चांगली किंवा वाईट कामगिरी ही त्या चॅनल्सच्या रेटिंगमध्ये त्याच आठवड्यात दिसून येत नाही.
  • चार आठवड्यांच्या सरासरीतून रेटिंग काढलं जात असल्याने नेमकी वर्तमान कामगिरी स्पष्ट होत नाही.

टीव्ही रेटिंगमधील महत्वाचे पॉईंट्स…

  • हा या वर्षातील रेटिंगचा १८ वा आठवडा आहे. पण न्यूज चॅनलचे स्थगित असलेले रेटिंग सुरु झाल्यानंतरचा हा १३वा आठवडा आहे.
  • मराठीतील सहा चॅनल्सच्या रेटिंगमध्ये टीव्ही 9 मराठीच पहिल्या स्थानी आहे. पण किंचित .१चा फरक आला आहे.
  • झी २४ तास हे चॅनल या आठवड्यात ०.३ने काहीसं मागे गेलं आहे. एबीपी माझा ०. ३ने पुढे गेले आहे.
  • साम या आठवड्यात .१ने मागे गेले आहे.
  • न्यूज 18 लोकमत याही आठवड्यात .३ ने वाढले आहे.
  • लोकशाही सहाव्या क्रमांकावर असून .२ने मागे गेले आहे.

कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?

  • मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात २८.३ % मार्केट शेअरसह टीव्ही9 मराठी हे न्यूज चॅनल नंबर १ आहे. त्यांच्यात ०.१ ची घट आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावर २६% मार्केट शेअरसह झी २४ तास आहे. गेल्या गुरुवारपेक्षा त्यांच्यात ०.३ ची घट आहे.
  • एबीपी माझा १९ % मार्केट शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.त्यांच्यात ०.३ची वाढ आहे.
  • साम टीव्हीने .१ची घट झाली असून १२% मार्केट शेअरसह चौथ्या क्रमांकावर आहे.
  • पाचव्या क्रमांकावर ९.४ % मार्केट शेअरसह न्यूज १८ लोकमत आहे. त्यांच्यात ०.३ची वाढ आहे.
  • सहाव्या क्रमांकावरील लोकशाही .२ ने मागे गेले असून त्यांचे ५.३ % मार्केट शेअर आहे.

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत.
  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे.
  • त्यामुळे अनेक टीव्ही चॅनल्सनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत.
  • फ्री डिशवरील वितरणामुळे झी समुहातील झी २४ ताससह ९ प्रादेशिक वाहिन्यांना ३० टक्के जास्त रेटिंग असलेल्या मार्केटमघ्ये पोहचण्याची संधी मिळते.
  • प्रसारभारतीनेही बार्ककडे झीविरोधात तक्रार केली आहे.
  • पण अद्याप त्याप्रकरणी काहीही कारवाई झालेली नाही.
  • सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
  • या गुरुवारी वर्षातील ११ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
  • ते रेटिंग ८, ९, १० आणि ११ अशा चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
  • या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

सरळस्पष्ट
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)

खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:

गेल्या आठवड्यात कसं होतं मराठी न्यूज चॅनल्सचं रेटिंग…

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: १२ आठवडे झाले तरी चॅनल्सचे मार्केट शेअर्समधील स्थान पूर्वीसारखं बदलत का नाही? समजून घ्या…

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: १२ आठवडे झाले तरी चॅनल्सचे मार्केट शेअर्समधील स्थान पूर्वीसारखं बदलत का नाही? समजून घ्या…

टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता.
नक्की पाहा:


Tags: ABP MAZAMarathi News ChannelsMAZA KATTATRPtulsidas bhoiteTV RatingTV9टीव्ही 9टीव्ही रेटिंगमराठी न्यूज चॅनल्स
Previous Post

“जनता सुजाण, नेते चुकल्यावर धडा शिकवते!” – शरद पवार

Next Post

नाना पटोलेंची खंजीरबाजी अजित पवारांना का वाटते हास्यास्पद?

Next Post
Nana Patole and Ajit Pawar

नाना पटोलेंची खंजीरबाजी अजित पवारांना का वाटते हास्यास्पद?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!