Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: १२ आठवडे झाले तरी चॅनल्सचे मार्केट शेअर्समधील स्थान पूर्वीसारखं बदलत का नाही? समजून घ्या…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
TV Rating Week 12

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

मराठी न्यूज चॅनल्सच्या दुनियेत प्रत्येक चॅनल्स आहे त्याच स्थानी कायम असल्याचं नवी पद्धत लागू झाल्यापासून दिसत आहे. त्याचं कारण म्हणून बार्कच्या नव्या रेटिंग पद्धतीकडे बोट दाखवलं जात आहे. सध्या जरी नाही तरी लवकरच बार्कच्या रेटिंगबद्दल पुन्हा आक्षेप घेतले जाण्याची शक्यता टीव्ही चॅनल्सच्या विश्वातील कुजुबुजीमुळे वाटत आहे. या १७ व्या आठवड्यात टीव्ही9 मराठी पहिल्या क्रमांकावरच आहे. झी २४ तास दुसऱ्या, एबीपी माझा ३ ऱ्या, साम ४ थ्या, लोकमत ५ व्या आणि लोकशाही ६ व्या स्थानावरच आहेत. या आठवड्यात पुन्हा टीव्ही 9 मराठीचा मार्केट शेअर ०.२ टक्क्यांनी, झी २४ तासचा ०.१ने तर सामचा ०.४ ने कमी झाला आहे. त्याचवेळी माझाने ०.५ टक्के, लोकमत ०.२ने तर लोकशाही ०.१ ने वाढले आहेत.

का बदलत नाही मार्केट शेअरमधील स्थान?

टीआरपी घोटाळ्यानंतर बंद पडलेले टीव्ही न्यूज चॅनल्सचं रेटिंग सुरु झाल्यापासून आजवर मराठी टीव्ही चॅनल्स ज्या स्थानावर होते, त्याच स्थानावर आजही आहेत. काही किरकोळ कमी अधिक होत असलं तरी स्थान मात्र बदलताना दिसत नाही. त्याच्या कारणाचा शोध घेतला असता बार्कच्या नव्या रेटिंग पद्धतीवर आक्षेप घेतला जात आहे.

टीव्ही चॅनल्स रेटिंगची चार आठवड्यांच्या सरासरीवर चालू एका आठवड्याचं रेटिंग काढण्याची बार्कची पद्धत टीव्ही चॅनल्सच्या स्थानांमध्ये फारसा बदल करणारी नाही. सरासरीच्या पद्धतीमुळे एखाद्या आठवड्यात एखाद्या चॅनलने भन्नाट कामगिरी केली, तरी त्याच्या आधीच्या ३ आठवड्यातील कामगिरी जर तेवढी चांगली नसेल तर त्या एका आठवड्याची कामगिरी ताज्या रेटिंगमध्ये प्रतिबिंबित होताना दिसत नाही. ती तशी दिसण्यासाठी सतत तशी चांगली कामगिरी किमान ४ आठवडे केली तरच ते मार्केट शेअरमध्ये प्रतिबिंबित होऊ शकेल. ज्यांची कामगिरी खालावेल, त्यांचंही तसंच आहे.

बार्कने चार आठवड्यांची सरासरी पद्धत का आणली?

टीआरपी घोटाळ्यापूर्वी प्रत्येक आठवड्याचं स्वतंत्र रेटिंग येत असे. अनेक महिने रेटिंग बंद झाल्यानंतर पुन्हा सुरु झाले तेव्हा चार आठवड्याच्या रेटिंगवर आधारीत सरासरी पद्धत आली. बहुधा मार्केटमधील प्रस्थापित चॅनल्सना ती फायद्याची वाटली असावी. एखाद्या न्यूज चॅनलने खूप भन्नाट बातमी किंवा कव्हरेज करून चांगली कामगिरी बजावली की ते चॅनल त्या आठवड्यात पुढे झेपावत असे, नंबर एकही होत असे. तसं काही घोटाळे करूनही एका आठवड्यापुरतं करणं शक्य आहे, असे आक्षेप घेत चार आठवड्यांच्या सरासरीची पद्धत आणण्यात आली. आता मात्र, त्यामुळे रेटिंगमधील चॅनल्सचं स्थान लवकर बदलत नसल्याचा दोष पुढे आला आहे. त्यात पुन्हा झी २४ तासचा डीडीच्या फ्रि डिशवरील अस्तित्वाचा मुद्दाही वादाचा विषय आहे.

टीव्ही रेटिंगमधील महत्वाचे पॉईंट्स…

  • हा या वर्षातील रेटिंगचा १७ वा आठवडा आहे. पण न्यूज चॅनलचे स्थगित असलेले रेटिंग सुरु झाल्यानंतरचा हा १२वा आठवडा आहे.
  • मराठीतील सहा चॅनल्सच्या रेटिंगमध्ये टीव्ही 9 मराठीच पहिल्या स्थानी आहे. पण किंचित फरक आला आहे.
  • झी २४ तास हे चॅनल या आठवड्यात काहीसं मागे गेलं आहे. एबीपी माझा ०. ५ने पुडे झेपावले आहे.
  • साम या आठवड्यात .४ ने मागे गेले आहे.
  • न्यूज 18 लोकमत याही आठवड्यात .२ ने वाढले आहे.
  • लोकशाही सहाव्या क्रमांकावर असून .१ने पुढे गेले आहे.

कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?

  • मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात २८.४ % मार्केट शेअरसह टीव्ही9 मराठी हे न्यूज चॅनल नंबर १ आहे. त्यांच्यात ०.१ ची घट आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावर २६.३% मार्केट शेअरसह झी २४ तास आहे. गेल्या गुरुवारपेक्षा त्यांच्यात ०.३ ची घट आहे.
  • एबीपी माझा १८.७ % मार्केट शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.त्यांच्यात ०.५ची वाढ आहे.
  • साम टीव्हीने .४ची घट झाली असून १२.१% मार्केट शेअरसह चौथ्या क्रमांकावर आहे.
  • पाचव्या क्रमांकावर ९.१ % मार्केट शेअरसह न्यूज १८ लोकमत आहे. त्यांच्यात ०.२ची वाढ आहे.
  • सहाव्या क्रमांकावरील लोकशाही .१ ने पुडे गेले असून त्यांचे ५.५ % मार्केट शेअर आहे.

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत.
  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे.
  • त्यामुळे अनेक टीव्ही चॅनल्सनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत.
  • फ्री डिशवरील वितरणामुळे झी समुहातील झी २४ ताससह ९ प्रादेशिक वाहिन्यांना ३० टक्के जास्त रेटिंग असलेल्या मार्केटमघ्ये पोहचण्याची संधी मिळते.
  • प्रसारभारतीनेही बार्ककडे झीविरोधात तक्रार केली आहे.
  • पण अद्याप त्याप्रकरणी काहीही कारवाई झालेली नाही.
  • सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
  • या गुरुवारी वर्षातील ११ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
  • ते रेटिंग ८, ९, १० आणि ११ अशा चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
    या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

सरळस्पष्ट

(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)

 

खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:
गेल्या आठवड्यात कसं होतं मराठी न्यूज चॅनल्सचं रेटिंग…

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: किंचित बदल…टीव्ही9, एबीपी माझा, लोकशाहीला फटका, २४ तास, साम, लोकमत फायद्यात!

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: किंचित बदल…टीव्ही9, एबीपी माझा, लोकशाहीला फटका, २४ तास, साम, लोकमत फायद्यात!

टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता.
नक्की पाहा:


Tags: ABP MAZAMarathi News ChannelsTRPtulsidas bhoiteTV 9TV RatingZee 24 Taasटीव्ही रेटिंगतुळशीदास भोईटेमराठी न्यूज चॅनल्स
Previous Post

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन

Next Post

नांदगाव परिसरातील औष्णिक विद्युत केंद्राची राख तातडीने उचलावी – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Next Post
Aditya Thackeray Suggestions at 'Mumbai in Transit' workshop

नांदगाव परिसरातील औष्णिक विद्युत केंद्राची राख तातडीने उचलावी - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!