मुक्तपीठ टीम
पहिल्या भारतीय महिला ऑलिम्पिक पदक विजेत्या कर्णम मल्लेश्वरी यांना ‘द आयरन लेडी’ म्हणून ओळखले जाते. त्यांना आता एक मोठा सन्मान मिळाला आहे. दिल्ली सरकारने त्यांची दिल्ली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या पहिल्या कुलगुरू म्हणून नेमणूक केली आहे. हरियाणाच्या यमुनानगरमधील रहिवासी असलेल्या मल्लेश्वरी यांनी सिडनी ऑलिम्पिक २०००मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते.
मल्लेश्वरी…विक्रम करी!
• मल्लेश्वरी ही ऑलिम्पिकच्या वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे.
• त्यांनी हा विक्रम जपत त्यांची कामगिरी सातत्यानं सुरू ठेवली आहे.
• मल्लेश्वरीला १९९४ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि १९९९ मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
• १९९९ मध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
• मल्लेश्वरी आता एफसीआयमध्ये चीफ जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
वडिलांचे क्रीडाप्रेम, आईची प्रेरणा!
• मल्लेश्वरी यांनी वयाच्या २५ व्या वर्षी सप्टेंबर २००० मध्ये सिडनी ऑलिम्पिकमध्ये स्नॅच प्रकारात ११० किलोग्राम आणि क्लीन अँड जर्कमध्ये १३० किलो वजन उचलले.
• अशा प्रकारे ऑलिम्पिकमध्ये पदक (कांस्य) जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
• त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्यांना ‘द आयरन लेडी’ असे नाव देण्यात आले.
• कर्णम मल्लेश्वरी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील व्हॉसवानीपेटा गावात झाला. वयाच्या १२ व्या वर्षापासून त्यांनी खेळाच्या मैदानावर प्रवेश केला.
• त्यावेळी त्यांचे वडील कर्णम मनोहर एक फुटबॉल खेळाडू होते.
• त्यांच्या चार बहिणी देखील वेटलिफ्टर होत्या.
• कर्णम मल्लेश्वरी खूप कमजोर असल्यामुळे त्यांना वजन उचलण्यास नकार दिला होता.
• मग त्यांची आई पुढे आली, तिने सतत प्रोत्साहन दिले.
यामुळे कर्णम मल्लेश्वरी यांच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला. जेव्हा आशियाई खेळापूर्वी राष्ट्रीय शिबिर आयोजित केले गेले होते. यात मल्लेश्वरी यांनी त्यांच्या बहिणीसमवेत प्रेक्षक म्हणून गेली होती. पण, यावेळी विश्वविजेत्या लिओनिड तारनेन्कोने त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी मल्लेश्वरी यांची प्रतिभा ओळखली. त्यांनी कर्णम मल्लेश्वरी यांना बेंगळुरूमधील क्रीडा संस्थेत पाठवले. येथून मल्लेश्वरीने आपली कौशल्य दाखवण्यास सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांनी आपले पहिले सीनियर राष्ट्रीय विजेतेपद आणि ऑलिम्पिक पदक जिंकले.