मुक्तपीठ टीम
डिजिटल आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सल्ला व उपचारांसाठी अॅपचा उपयोग करण्याचे प्रमाण भारतात वेगाने वाढत आहे. कोरोना महामारीमुळे उत्पन्न झालेल्या समस्या आणि सोशल डिस्टंसिंगच्या प्रतिबंधांमुळे हा बदल घडून आला आहे. कंटारने केलेल्या आणि मेडिक्स ग्लोबलने सोपवलेल्या एका संशोधन अभ्यासात हे निष्कर्ष आढळून आले आहेत.
भारतात डिजिटल आरोग्य सेवांची वाढलेली मागणी आकड्यांमध्ये
• सर्वेक्षणात सहभागी झालेल्या एकूण लोकांपैकी ६६% लोक डिजिटल आरोग्य अॅपचा उपयोग करत आहेत आणि सध्या जे या अॅपचा उपयोग करत नाहीत त्यांच्यापैकी ८८% लोक भविष्यात त्यांचा उपयोग करतील.
• ९०% पेक्षा जास्त व्यक्तींनी सांगितले की, महामारीमुळे त्यांच्याकडून भविष्यात डिजिटल आरोग्य अॅप आणि टेली-कंसल्टेशनसचा उपयोग करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
• हृदयरोग (५६%), श्वसनाचे आजार (५६%) आणि मधुमेह (५४%) या भारतीयांसाठी आरोग्याला भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या तीन चिंता आहेत.
• ९३% लोकांनी सांगितले की, ते बहु-विषयक दृष्टीकोन आणि वैयक्तिक केसेसच्या व्यवस्थापन सेवांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत.
भारतातील एकूण लोकसंख्येपैकी आरोग्य विमा पॉलिसीधारकांपैकी प्रातिनिधिक समूहासोबत केल्या गेलेल्या या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ९०% पेक्षा जास्त लोकांनी असा दावा केला आहे की, महामारीमुळे त्यांच्याकडून भविष्यात डिजिटल आरोग्य अॅप आणि टेली-कन्सल्टेशन सेवांचा उपयोग केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डिजिटल अॅपमध्ये कोणती वैशिष्ट्ये असणे गरजेचे आहे असे विचारले गेल्यावर, उत्तर देणाऱ्यांनी त्यांच्याकडून नक्की वापरली जातील अशी तीन वैशिष्ट्ये सांगितली, जी पुढीलप्रमाणे आहेत – १) डेडिकेटेड डॉक्टर्स/नर्ससोबत व्हिडिओ कॉल (६६%); २) रक्त तपासणीच्या निष्कर्षांचे आकलन (६५%); ३) वैद्यकीय नोंदी अपलोड करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे आणि ते इतरांसोबत शेअर करणे (६२%)
मेडिक्स ग्लोबलच्या संस्थापिका आणि सीईओ श्रीमती सिगल एटजमन यांनी सांगितले, “दर तीन पैकी दोन भारतीय डिजिटल आरोग्य अॅपचा उपयोग करत आहेत आणि जे आता उपयोग करत नाहीत त्यांच्यापैकी ८८% लोकांनी भविष्यात त्यांच्याकडून या अॅपचा उपयोग केला जाण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे डिजिटल आरोग्य आणि आरोग्य सेवा क्षेत्राच्या भविष्याचे एक सुस्पष्ट चित्र उभे राहिले आहे. दूरवरून आणि डिजिटल स्वरूपात आधुनिक पद्धतीने आरोग्य देखभाल सेवा सुरु झाल्या आहेत आणि लोक नवी तंत्रे उपयोगात आणण्यासाठी उत्सुक आहेत. आपल्या घरातूनच वेगवान, सुरक्षित आणि अधिक जास्त किफायतशीर आरोग्यसेवा मिळवता याव्यात अशी लोकांची इच्छा आहे.”
डिजिटल अॅपची सर्वात आवश्यक वैशिष्ट्ये:
या अभ्यासानुसार, दर पाचपैकी तीन भारतीय टेली-कन्सल्टेशनचा उपयोग आधीपासूनच करत आहेत, आणि ज्यांनी आजवर उपयोग केलेला नाही त्यांच्यापैकी ९३% लोकांनी भविष्यात यांचा उपयोग करण्याची शक्यता वर्तवली आहे.
डिजिटल आरोग्यसेवांबाबत लोकांच्या काय भावना आहेत याबाबत सर्वेक्षणात आढळून आलेले निष्कर्ष:
- सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ६४% लोक टेली-कन्सल्टेशन सेवा आधीपासून वापरत आहेत, उरलेल्या ३६% पैकी ९३% लोकांनी भविष्यात ते टेली-कन्सल्टेशन वापरतील अशी शक्यता वर्तवली आहे.
- ९०% पेक्षा जास्त लोक कोरोनामुळे भविष्यात डिजिटल आरोग्य अॅपचा उपयोग करण्यासाठी आणि टेली-कन्सल्टेशन सेवा घेण्यासाठी तयार झाले आहेत.
- खासकरून कॅन्सरशी संबंधित तंत्रज्ञानासाठी माहितीचा शोध घेतला जाण्याची शक्यता सर्वात जास्त वर्तवली गेली (९६%), जर सहजपणे उपलब्ध असतील तर नवीन तंत्रांचा लाभ घेण्याची शक्यता ९८% लोकांनी व्यक्त केली आणि अशा प्रकारच्या कॅन्सरशी संबंधित तपासण्या कव्हर करण्यासाठी आपल्या पॉलिसीला अपग्रेड करण्याची शक्यता असल्याचे ९६% लोकांनी सांगितले आहे.
श्रीमती एटजमन यांनी पुढे सांगितले, “सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, कोरोनाचा डिजिटल आरोग्य अॅप आणि टेली-कन्सल्टेशनकडे पाहण्याच्या भारतीयांच्या दृष्टिकोनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला आहे. डिजिटल हेल्थकेयर सेवांची मागणी खूप वाढली आहे आणि ही महामारी आरोग्यसेवा उद्योगक्षेत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण वळण ठरली आहे, डिजिटायझेशनला प्राधान्य देण्याची गरज आहे.”
आपल्या कुटुंबातील सदस्यांना हृदयरोग, श्वसनाचे आजार किंवा मधुमेहाचे निदान होईल की काय अशी चिंता ५०% पेक्षा जास्त भारतीयांना भेडसावत आहे. त्यामुळे ८२% लोकांनी अशा आजारांना आळा घातला जावा व ते आजार उत्पन्न होत असतील तर ते लवकरात लवकर समजून यावे यासाठी नियमित तपासण्या केल्या आहेत.
हा अभ्यास जून २०२१ मध्ये केला गेला आणि ३० ते ५९ वर्षे वयोगटातील १००० भारतीय आरोग्यविमा पॉलिसी धारकांच्या अंतर्दृष्टीवर केंद्रित आहे. हे सर्वेक्षण त्यांच्या वर्तमान भावना, बदलती मते आणि आरोग्यविषयक चिंता, उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवा व डिजिटल आरोग्य सेवांमध्ये वाढता रस याबाबत त्यांचा भविष्यातील दृष्टीकोन काय असेल ते दर्शवते.
भारतातील आरोग्यसेवा व्यवस्थेवरील विश्वास
निष्कर्ष असे दर्शवतात की सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी बहुतांश लोक (६९%) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेपेक्षा (५७%) खाजगी आरोग्य व्यवस्थेविषयी अधिक समाधानी आहेत. त्यांनी सांगितले की, वैद्यकीय व्यवस्थेचा दर्जा, पारदर्शकता आणि उपचारांचा किफायतशीरपणा या बाबतीत सुधारणा होण्याची गरज आहे. बहुतांश लोकांनी (९३%) सांगितले की, त्यांना बहु-विषयक दृष्टीकोन आणि वैयक्तिक प्रकरण व्यवस्थापन सेवांमध्ये रस आहे.
दहापैकी आठ भारतीय असे मानतात की, आजारांना आळा घालण्यासंदर्भात जनरल प्रॅक्टिशनरकडून मिळवली जाणारी माहिती पुरेशी आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की, विशेषज्ञ निवडण्याच्या शिफारसीसाठी मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्यांशी सल्लामसलत करणे आणि जनरल प्रॅक्टिशनरशी चर्चा करणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात.
८०% पेक्षा जास्त लोकांनी एखादी परिस्थिती, निदान किंवा उपचार समजून घेत असताना विशेषज्ञाने दिलेल्या स्पष्टीकरणावर विश्वास व्यक्त केला आणि जवळपास ९०% लोकांनी सांगितले की, त्यांना विशेषज्ञांसोबत वैयक्तिक पद्धतीने बोलणे योग्य वाटते. अभ्यासात असे आढळून आले आहे की, ज्यांना आधी गंभीर परिस्थितीबाबत समजलेले होते त्या ३१% लोकांपैकी ९२% लोकांनी दुसरे मत (सेकंड ओपिनियन) घेतले. ज्या लोकांच्या बाबतीत गंभीर वैद्यकीय स्थितीचे निदान करण्यात आलेले नाही त्यांच्यापैकी बहुतांश (९३%) लोकांनी सांगितले की, भविष्यात असे काही झाले तर ते दुसरे मत घेतील.
मेडिक्सने सोपवलेले, मेडिक्स मेडिकल मॉनिटर रिसर्च सर्वेक्षण प्रमुख बहुराष्ट्रीय बाजारपेठ संशोधन कंपनी कंटारने ७ जून ते २५ जून २०२१ या कालावधीत केले आणि यामध्ये थायलंड, हॉंगकॉंग, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, भारत व ऑस्ट्रेलियामधील आरोग्यविमा पॉलिसी धारकांच्या प्रातिनिधिक समूहाचे सर्वेक्षण केले गेले. या सर्वेक्षणात ग्राहकांची जागरूकता आणि आरोग्यासंबंधी मुद्दे, कॅन्सरबद्दल दृष्टीकोन आणि डिजिटल आरोग्यसेवांमध्ये रस हे मुद्दे सामील करण्यात आले आहेत. मेडिक्स या निष्कर्षांचा उपयोग या बाजारपेठांमधील प्रमुख आरोग्य ट्रेंड्स आणि आपल्या प्रमुख सेवा प्रस्तुतींमध्ये ग्राहकांचा रस समजून घेण्यासाठी करत आहे.
* या सर्वेक्षणात बंगलोर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्ली या सहा शहरांमधील उत्पन्न, वय आणि लिंग याबाबतीत वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असलेल्या भारतीयांचे सर्वेक्षण केले गेले आहे.
मेडिक्सविषयी महत्वाची माहिती:
२००६ मध्ये स्थापन करण्यात आलेली मेडिक्स ही नाविन्यपूर्ण, उच्च दर्जाच्या, डिजिटल आणि दूरस्थ वैद्यकीय व्यवस्थापन सेवा सुविधा प्रदान करणारी, जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी आहे. मेडिक्सची कार्यालये लंडन, हॉंगकॉंग, शांघाय, सिंगापूर, जकार्ता, कुआलालंपूर, बँकॉक, मेलबर्न, मुंबई आणि तेल अवीव याठिकाणी आहे आणि ही कंपनी ९० पेक्षा जास्त देशांमध्ये लाखो ग्राहकांना सेवा प्रदान करते. एक सामायिक मूल्य कंपनी या नात्याने मेडिक्स आपल्या ग्राहकांना, खासकरून जागतिक आरोग्य आणि जीवन विमा कंपन्या, आर्थिक समूह, मोठ्या कॉर्पोरेट आणि सरकारी संस्था यांना आरोग्यसेवा जगतातील महत्त्वपूर्ण अतिरिक्त मूल्य प्रदान करते, ज्यामुळे त्यांना आपला दृष्टीकोन फक्त हेल्थ पेयर्सपुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये परिवर्तन करून रियल हेल्थ प्लेयर्स बनण्यात मदत मिळते.