मुक्तपीठ टीम
भारत सरकारने कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय बदलला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील सर्वात मोठे विषाणू तज्ज्ञ डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी कोरोना लसीच्या डोसमधील अंतराबद्दल इशारा दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, लसीच्या दोन डोसांमधील कालावधी वाढविण्यामुळे लोकांमध्ये संसर्गाचा धोका वाढू शकतो. ब्रिटनमध्ये तसा अनुभव आला आहे.
कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर
• भारतात कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर हे मुळात ६ ते ८ आठवडे होते.
• केंद्र सरकारने अभ्यास समुहाच्या शिफारशींचा हवाला देत ते १२ ते १६ आठवड्यांपर्यंत म्हणजे दुपटीने वाढवले आहे.
• सरकारचे म्हणणे आहे की, दोन डोसमधील अंतर वाढल्यास लसीचा प्रभाव वाढेल.
• मात्र, हा निर्णय भारतातील लसटंचाईच्या काळात घेतला गेल्याने त्यावर वेगळी चर्चाही रंगली.
• भारतात दोन डोसमधील अंतर वाढवल्याने अँटीबॉडी जास्त तयार होत असल्याचा दावाही करण्यात आला.
• मात्र, ऑक्सफर्डची कोव्हिशील्ड लस ज्या देशात शोधण्यात आली त्या ब्रिटनमध्येच लसींच्या दोन डोसमधील कालावधी कमी करायचा निर्णय झाला.
• त्यामुळे भारतातील अंतर वाढवण्याच्या निर्णयाकडे संशयानेच पाहिले जात होते.
अमेरिकन विषाणू तज्ज्ञांचे काय मत?
• डॉ. अँथनी फाऊची म्हणतात की, लसीकरणातील अंतर वाढवण्याऐवजी आपण वेळापत्रकानुसार पुढे गेले पाहिजे.
• जर आपल्याकडे लसींचा पुरवठा फारच कमी असेल तर, हे अंतर वाढविणे आवश्यक आहे.
• कोरोनाच्या अधिक संसर्गजन्य अशा डेल्टा व्हेरिएंटवर जोर देऊन फाऊची यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी लोकांना शक्य तितक्या लवकर लस देण्याची गरज आहे.
• डेल्टा व्हेरिएंट प्रथम भारतात सापडला आणि असे म्हणतात की हा प्रकार देशातील दुसर्या लाटेचे मुख्य कारण होते.
• तज्ज्ञांच्या मते, तो ४० ते ५०% अधिक संसर्गजन्य आहे.