मुक्तपीठ टीम
मुंबईच्या विलेपार्ले भागातील एका महाविद्यालयाचे ऑनलाइन क्लास सुरु असतानाच पॉर्न व्हिडीओ सुरु झाले. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे असे काही साइड इफेक्ट कधीही उद्भवू शकतात. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणातील पॉर्न आणि अन्य नको ती घुसखोरी, कशी टाळता येईल, यावरील काही साध्या सोप्या टिप्स:
सर्वांसाठी
• सर्वात महत्वाचं म्हणजे ऑनलाइन क्लासेसचा पहिला वर्ग हा त्या क्षेत्रातील एखाद्या तज्ज्ञाकडून शिक्षकांसाठी घेतला जावा.
• अनेकदा शिक्षक हे विद्यार्थ्यांपेक्षाही अनभिज्ञ असतात.
• शिक्षकांचे ऑनलाईन तंत्राच्या बाबतीत प्रशिक्षण हे खूप महत्वाचे आहे.
• तसेच काही शिक्षण विद्यार्थ्यांनाही देण्यात यावे.
• शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांना देशातील आयटी कायद्यानुसार कोणत्याही प्रकारे बेकायदा अक्सेस, पॉर्नसारखे अनुचित कन्टेन्ट वापरणे कसे गुन्हेगारी कृत्य आहे, त्यासाठीची शिक्षा याबद्दलही समजवले जावे.
शिक्षण संस्था
• ऑनलाइन क्लासेससाठी योग्य सेवाच वापरा.
• केवळ मोफत मिळत आहे, म्हणून वाट्टेल ती सेवा वापरू नये. तसेच दर्जेदार सेवेच्या फ्री पॅकेजमध्ये काही मर्यादा असू शकतात. त्यामुळे मोफतचा हव्यास नसावा.
• प्रत्येक लाइव्ह सेवेत अॅक्सेससाठी काही नियम, अटी असतात, त्यांचे पालन कडकपणे केले जावे.
• अशा सेवेत कोणाला किती अॅक्सेस अधिकार तेही ठरवण्याची सोय असते ती काटेकोरपणे वापरण्यात यावी.
• ज्या डिव्हाइसचा वापर शिक्षण संस्था ऑनलाइन शिक्षणासाठी करतात, त्यांचे यूएसबी तसेच इतर अॅक्सेस हे पासवर्ड प्रोटेक्टेड सिंगल वन टाइम यूजचेच असले पाहिजेत.
पालक
• आपल्या मुलांचे ऑनलाइन रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.
• मुलांच्या डिव्हाइसवर अयोग्य सामग्रीचे फिल्टरिंग आणि ब्लॉक करण्यासाठी तंत्रज्ञान साधने कशी वापरावी आणि त्यांना ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावं याबद्दल टिप्स उपलब्ध असतात, त्या मिळवा.
• पॅरंटल कंट्रोलसारखी सोय आपल्या मुलांना अयोग्य सामग्रीत प्रवेश करण्यापासून वाचविण्यात मदत करू शकतात, परंतु इंटरनेटवर त्यांना दिसणारी प्रत्येक गोष्ट आपण तपासू शकत नाही.
• आपल्याला त्यांना अनुचित सामग्री टाळण्यासाठी त्यांची मानसिक मदत करण्याची आणि ते पाहिल्यास त्याशी सामना करण्यासाठी सज्ज करण्याची आवश्यकता आहे.
• इतर पालकांशी आणि शाळेशी ऑनलाईन सुरक्षिततेविषयी बोला
• इतर पालक आणि आपल्या मुलाच्या शाळेस विचारा की ते कोणत्या प्रकारचे नियमांचे अनुसरण करीत आहेत आणि त्यांनी काय सुचविले आहे.
सेफ सर्च
• वयानुसार योग्य परिणाम दिसतील हे सुनिश्चित करण्यासाठी आपण गुगल किंवा अन्य सर्च इंजिनात सेफ सर्चचा पर्याय ऑन करु शकतो, यूट्युबवरही ती सोय आहे.
• अर्थात येथे एक लक्षात घ्या, आपली मुले ही आपल्या पुढच्या पिढीतील आहेत. त्यामुळे त्यांना तंत्रज्ञानाची माहिती आपल्यापेक्षाही चांगली असू शकते. त्यामुळे केवळ असे तांत्रिक उपाय आपल्याबाजूने पुरेसे नसतात, त्यासाठीच त्यांच्याशी उपदेशात्मक नाही तर संवादातून शिक्षण आवश्यक असते.
मुलांशी संवाद
• पहिली पायरी म्हणजे त्यांच्याशी याबद्दल बोलणे.
• आपल्या मुलाने इंटरनेट वापरताना तेथे काय सापडेल, याबद्दल आपण बोलणे सुरू केले पाहिजे.
• त्यांना समजून घेण्यात मदत करा की कधीकधी ते कदाचित त्या गोष्टी पाहू शकतात जे पाहणे त्यांना पसंत नसते किंवा आपण कदाचित त्या पाहू नयेत असे त्यांना वाटते.
• मुलांशी असा संवाद नियमितपणे करा.
• आपली मुले लहान असतील, तर समजावून सांगा की वयाची मर्यादा अयोग्य सामग्रीपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी आहे.
• काही गैर घडलं तरी मुलांनी तुमच्याशी विश्वासानं बोललं पाहिजे, असा विश्वास त्यांच्या मनात रुजवा.
हेही वाचा: कॉलेजच्या ऑनलाइन वर्गात पॉर्न व्हिडीओ, मुंबई पोलिसांकडून तपास सुरु
कॉलेजच्या ऑनलाइन वर्गात पॉर्न व्हिडीओ, मुंबई पोलिसांकडून तपास सुरु