Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोशल मीडिया यूजर्ससाठी अलर्ट! बनावट अकाउंट्सना आळा घालण्यासाठी निर्णय

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
social media

मुक्तपीठ टीम

बनावट सोशल मीडिया अकाउंट्समध्ये सातत्याने वाढत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर अनेक बनावट खाती कार्यरत आहेत. त्यामुळे खात्यांची गोपनियता राखण्यासाठी भारत सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सरकार या बनावट अकाउंट्सवर आधीच्या नवीन नियमांतर्गत लगाम लावण्याचा प्रयत्न करत आहे.

सोशल मीडिया यूजर्ससाठी नवीन नियम

  • भारत सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना सांगितले की, बनावट अकाउंट संबंधित नोटीस मिळताच २४ तासात ते अकाउंट्स बंद करावेत.
  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठीच्या या नवीन आयटी नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
  • त्यामुळे तक्रार मिळताच कारवाई करण्याशिवाय कोणताच पर्याय राहणार आहे.
  • तसेच एखाद्या व्यक्तीने खेळाडू, चित्रपट अभिनेते, महिला कलाकार, राजकारणी इत्यादींचे बनावट प्रोफाईल तयार करुन आपले फॉलोअर्स वाढवण्याचा प्रयत्न करणारे अकाउंटही २४ तासात बंद केले जावेत.
  • कारण बनावट प्रोफाइल तयार करण्यामागील कारणे ही वेगवेगळी असू शकतात.

 

पासवर्ड वापरा, डेटा चोरीपासून बचाव करा

सध्याचं दिवसगणित बदलत चाललेलं तंत्रज्ञान पाहता मोबाईल, लॅपटॉपची सिक्युरीटी ही फार महत्वाची झाली आहे. तुमची वैयक्तिक माहिती तसंच डेटा चोरी होऊ नये, यासाठी तुम्ही नेमकं काय करु शकता, याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात.

 

काय असतो पासवर्ड?

तुमचा डेटा, डिवाईसला सुरक्षित ठेवणाऱ्या एलिमेंटला पासवर्ड म्हणतात. सुरुवातीला पासवर्ड हे फक्त नंबर किंवा अल्फाबेट असायचे, मात्र आता तुमच्या बोटांचे ठसे, चेहरा आणि डोळेही पासवर्ड म्हणून वापरता येतात. पासवर्डचे फॉरमॅट आता वेगवेगळे झाले आहेत.

 

पासवर्डचा वापर कुठे होतो?

स्मार्टफोनमध्ये डेटा गरजेचा असो किंवा नसो, पण पासवर्डची सुरुवात इथूनच होते. त्याचबरोबर फोनमध्ये वापरले जाणारे जिमेल अकाउंट, सोशल मीडिया (व्हॉट्सॲप, फेसबुक, सिग्नल, ट्विटर इत्यादी) आणि वेगळे वेगळे ऍप्स, गॅलरीमध्ये पासवर्डचा वापर केला जातो. तसंच बँकिंग सोशल मीडिया यूपीआयमध्ये पासवर्डचा वापर केला जातो.

 

आपण रोज किती पासवर्डचा वापर करतो?

तज्ज्ञांच्या मते, पासवर्डचा वापर स्मार्टफोनमध्येच अधिक होतो. फोनला अनलॉक करण्यापासून ते काही महत्वाचे ऍप्स अनलॉक करेपर्यंत दिवसभरात डझनभर किंवा त्यापेक्षा जास्त पासवर्डचा वापर केला जातो. त्यासोबत, जे यूजर लॅपटॉपचा वापर करतात ते पण लॉगईनसाठी पासवर्डचा वापर करतात.

 

सुरक्षित पासवर्ड बनवणं महत्वाचं

• पासवर्डमध्ये कमीत कमी १० ते १५ अल्फाबेटचा वापर करा.
• यात नंबर्सचाही वापर करा.
• पासवर्डमध्ये एक अल्फाबेट कॅपीटलमध्ये जरूर ठेवा.
• स्पेशल कॅरेक्टर जसे की ! @#$%^&*) चा वापर करा.
• वेळोवेळी तुमचा पासवर्ड बदलत राहणे.
• जिथे शक्य आहे तिथे पासवर्डला ओटीपीने प्रोटेक्ट करा.

 

सोप्या शब्दांचा पासवर्ड बनवू नये

• पासवर्डमध्ये ८ पेक्षा कमी कॅरेक्टरचा वापर करु नये.
• पासवर्डमध्ये तुमचं नाव, बर्थ डेटचा वापर करू नये.
• तुमच्या यूजर नेमला सुद्धा पासवर्ड बनवू नये.
• पासवर्ड कधी कोणाला विचारून बनवू नये.


Tags: Indian governmentsocial media appsocial media userswhatsappआयटी नियमइंस्टाग्रामट्विटरफेसबूकव्हॉट्सअॅपसोशल मीडिया प्लॅटफॉर्म
Previous Post

ऑनलाइन शिक्षणात कशी टाळाल ‘पॉर्न’ घुसखोरी? या घ्या टिप्स…

Next Post

केंद्र जुलैमध्ये राज्यांना फक्त १२ कोटी डोस देणार, दिवसाला एक कोटीचं उद्दिष्ट कसं पूर्ण होणार?

Next Post
vaccination

केंद्र जुलैमध्ये राज्यांना फक्त १२ कोटी डोस देणार, दिवसाला एक कोटीचं उद्दिष्ट कसं पूर्ण होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!