मुक्तपीठ टीम
लस घेतल्यानंतर सरकारकडून जारी केलेले लसीकरण प्रमाणपत्र तुम्ही सोशल मीडियावर चुकूनही शेअर करु नका. आधी केलं असेल तर त्वरित डिलीट करा. याबाबतीत कायम सावधगिरी बाळगा. कारण यामुळे तुमचा वैयक्तिक डेटा लीक होण्याची भीती आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानेच याबाबत अलर्ट जारी केला आहे. गृह मंत्रालयाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर (सायबर दोस्त) एक पोस्टरही जारी केले आहे.
लसीकरण प्रमाणपत्र पोस्ट करण्याचा धोका काय?
• लसीकरण प्रमाणपत्रात नाव, वय, लिंग आणि पुढील डोससंबंधची तारीख यासह अनेक महत्वाची माहिती असते.
• प्रमाणपत्रात असलेला क्यूआर कोड स्कॅन करून उर्वरित तपशील देखील उपलब्ध आहेत.
• ही माहिती मिळवून गुन्हेगार शासकीय कर्मचारी म्हणून फोन करू शकतात.
• मिळवलेले तपशील सांगून ते विश्वास कमवून ओटीपी आणि इतर वैयक्तिक माहिती मिळवू शकतात.
• ही माहिती गुन्हेगारांसाठी फायद्याची ठरू शकतात.
Beware of sharing #vaccination certificate on social media: pic.twitter.com/Tt9vJZj2YK
— Cyber Dost (@Cyberdost) May 25, 2021
वैयक्तिक तपशील नोंदवलेले लसीकरण प्रमाणपत्र हे सरकारी असल्याने अनेकजण त्याचा वापर पॅनकार्डसारखा पुरावे म्हणून करत कआहेत. यामुळे, आर्थिक डेटा सायबर ठगांकडे जाऊन फसवणूक होण्याचा धोका आहे.
या गोष्टी लक्षात ठेवा
- ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका
- दुसर्या डोसनंतरच आपले प्रमाणपत्र डाउनलोड करा.
- सोशल मीडियावर प्रमाणपत्र शेअर करू नका.
- लसीकरणासंबंधित कोणत्याही कॉलवर वैयक्तिक डेटा किंवा ओटीपी शेअर करू नका.
- लसीसंबंधित कोणताही बनावट संदेश किंवा लिंक पुढे पाठवू नका.
- जर एखादी व्यक्ती असे करत असेल तर त्याला तत्काळ त्याबद्दल सावध करा.