मुक्तपीठ टीम
हिरो मोटोकॉर्प ही मोटरसायकल आणि स्कूटर विश्वातील सर्वात मोठी आणि नामांकित उत्पादक कंपनी आहे. हिरो मोटोकॉर्पने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर सुरू केल्या आहेत. कंपनीने आज एक विशेष रिटेल फायनान्स कार्निव्हल सुरू केला आहे. या कार्निव्हलमध्ये ग्राहकांना कंपनीचे वाहन कोणत्याही डाऊन पेमेंटशिवाय मिळवता येईल. व्याज न घेता खरेदी करण्याची सुविधा मिळणार आहे. एवढेच नाही तर, ग्राहकांना फक्त आधार कार्डद्वारेच कर्ज घेता येणार आहे.
डाउन पेमेंट किंवा व्याजदराची चिंता नाही
- वर्षाच्या अखेरीस, हिरोने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिटेल फायनान्स कार्निव्हल सुरू केले आहे.
- या आकर्षक संधीची फायदा ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत घेता येईल.
- कार्निव्हलमुळे देशातील विविध विभागातील ग्राहकांना सुलभ फायनान्सवर सहज वाहने खरेदी करता येतील.
- याअंतर्गत ग्राहकांना शून्य डाउन पेमेंट, शून्य व्याजदर आणि शून्य प्रक्रिया शुल्क अशा सुविधा मिळणार आहेत.
फक्त एका आधार कार्डावर कर्जाची सुविधा
- हिपो मोटोकॉर्पने एक आधार कार्डद्वारे कर्जासाठी अर्ज करणारी योजना देखील सुरू केली आहे.
- ज्या अंतर्गत ग्राहकांना वाहन वित्तपुरवठा करण्यासाठी त्यांचे आधार कार्ड दाखवणे आवश्यक आहे.
- मुख्य ऑफर व्यतिरिक्त, ते कार्निव्हल ग्राहकांना किसान हप्ता, नो हायपोथेकेशन आणि सुविधा (बँकेच्या चेकशिवाय) यांसारखी विशेष आर्थिक उत्पादने देखील ऑफर करत आहे.
- या योजनांचा लाभ घेण्यासाठी, ग्राहक हिरो मोटोकॉर्पच्या अधिकृत डीलरशिप आणि ऑनलाइन चॅनेलला भेट देऊ शकतात.
पाहा व्हिडीओ: