मुक्तपीठ टीम
सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढू लागली आहे. भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सवलतीही देत आहे. भविष्यात फक्त इलेक्ट्रिक वाहनेच असतील असेही सांगितले जात आहे. तसं खरंच घडलं कर आज पेट्रोलपंपला असलेलं महत्व हे चार्जिंग स्टेशनना असेल. त्यामुळेच ज्यांना भविष्यात व्यवसायात करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी चार्जिंग स्टेशन्स ही एक चांगली व्यावसायिक संधी असू शकते.
पारंपरिक इंधनाकडून बहुसंख्य वाहनचालक जर ई-वाहनांकडे वळले तर तेव्हा सर्व पेट्रोल पंपच्याजागी चार्जिंग स्टेशन असतील. सर्व कार कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करत आहेत. अशा परिस्थितीत चार्जिंग स्टेशन्सची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ही स्टेशन्स उघडून मोठी कमाई करणे शक्य होणार आहे. जाणकारांच्या मते कमी पैसे गुंतवून जास्त नफा मिळवण्यासाठी ही नवी व्यावसायिक करिअर संधी असू शकणार आहे.
देशभरात हजारोंच्या संख्येने चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना
- भविष्यातील ई-चार्जिंग स्टेशन्सची गरज लक्षात घेत काही कंपन्यांनी आतापासूनच या नव्या क्षेत्राकडे लक्ष वळवलंय.
- इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा उपलब्ध करून देणारी EVRE कंपनी येत्या दोन वर्षात १०,००० चार्जिंग स्टेशनची स्थापना करणार आहे.
- देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही स्टेशन्स असणार आहेत.
- कंपनीने यासाठी स्मार्ट पार्किंग ब्रँड पार्क प्लस सोबत करार केला आहे.
- EVREने जाहीर केल्यानुसार आहे की ते चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुविधेचे डिझाइन, बांधकाम, स्थापना, ऑपरेशन आणि देखभाल करतील, तर चालवणारा पार्किंग+ जमिनीची व्यवस्था करेल.
चार्जिंग सेंटर उघडण्यासाठी काय करायचं?
- ई-वाहनांचा वापर वाढवण्यासाठी देशातील इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्सची संख्या वाढवणे आवश्यक आहे.
- त्यासाठी सरकार तरुणांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून ई-चार्जिंग स्टेशन चालवण्याचे प्रशिक्षण देत आहे.
- या प्रशिक्षणादरम्यान चार्जिंग स्टेशनची संपूर्ण माहिती दिली जाईल.
- ई-चार्जिंग स्टेशनचे मेकॅनिझम, सोलर पॉवर इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर, बिझनेस, सोलर पीव्ही चार्जिंग कनेक्टिव्हिटी लोड्स, इलेक्ट्रिसिटी टॅरिफ इत्यादी बद्दल माहिती दिली जाईल.
- या व्यवसायाबद्दल सर्व काही स्पष्ट केले जाईल. यानंतर चार्जिंग स्टेशन उघडणे कोणालाही शक्य होईल.
चार्जिंग स्टेशनशी संबंधित नियमा कोणते?
- NITI आयोगाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग नेटवर्क उभारण्यासाठी धोरणे आणि निकष मांडण्यासाठी नवीन हँडबुक जारी केले आहे.
- राज्य सरकारे आणि स्थानिक संस्था या पुस्तिकेच्या आधारे इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी धोरणे तयार करतील.
- हे हँडबुक नीती आयोग, ऊर्जा मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, ऊर्जा कार्यक्षमता ब्यूरो आणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडिया यांनी संयुक्तपणे तयार केले आहे.
- या दशकाच्या अखेरीस सर्व व्यावसायिक कारपैकी ७० टक्के, ३० टक्के खाजगी कार, ४0 टक्के बसेस आणि ८० टक्के दुचाकी आणि तीन चाकी गाड्या इलेक्ट्रिक करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.
चार्जिंग स्टेशन सुरु करण्याच्या पायऱ्या
- अनेक कंपन्या ईव्ही चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी फ्रँचायझी देतील.
- इव्ही स्टेशनची माहिती असणे आवश्यक आहे. • कंपन्या फ्रँचायजी देण्यास सुरुवात करताच, कंपन्यांकडून फ्रँचायझी घेऊन चार्जिंग स्टेशन उघडता येणे शक्य आहे.
- इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन बसवण्यासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च येऊ शकतो.
- गुंतवणूक करताना येणाऱ्या या कमी खर्चात दररोज चांगली रक्कम कमावणे शक्य आहे.
(ही बातमी इंटरनेटवर उपलब्ध माहिती आणि जाणकारांनी दिलेले मुद्दे लक्षात घेऊन लिहिण्यात आली आहे. कृपया या व्यवसाय संधीवर विचार करताना सरकारी अधिकारी, तज्ज्ञ आणि आपल्या विभागातील व्यावसायिक परिस्थिती यांचा विचार करुनच निर्णय घ्यावा. नवे क्षेत्र आकर्षित असले तरी व्यावसायिक संधी आणि स्थानिक परिस्थिती महत्वाची ठरते.)