Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निवृत्ती वेतन मिळवणे आता अधिक सोयीस्कर! हयातीच्या दाखल्यासाठी खास अधिकारी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
pensioners

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना यापुढे वार्षिक जीवित प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. केंद्र सरकारने या प्रमाणपत्रासाठी देशभरात अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. ते निवृत्तीवेतनधारकाच्या जीवित प्रमाणपत्राची नोंद करू शकतील. म्हणजेच, जर पेन्शनर किंवा फॅमिली पेन्शनर बँक, ट्रेजरी, पोस्ट ऑफिस किंवा इतर कोणत्याही सरकारी केंद्राला भेट देऊन प्रमाणपत्र देत असतील तर ते स्वीकारले जाईल. यामुळे त्यांचे पेन्शन थांबणार नाही.

 

पेन्शन मिळवणे आता अधिक सोपे

  • अंडर सेक्रेटरी राजेश कुमार यांनी याबद्दल सविस्तर सांगितले.
  • केंद्रीय कर्मचारी जीवित प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेकडे जातात.
  • दरवेळी बँकाच्या फेऱ्यांमुळे त्यांना खुप त्रास सहन करावा लागतो
  • त्यामुळे सरकारने आणखी अनेक केंद्रे सुरू केली आहेत, जिथे जीवित प्रमाणपत्र दाखवता येतील.
  • ज्या बँकेत पेन्शन येते, तेथे जीवित प्रमाणपत्र मॅनेजर किंवा इतर कोणत्याही कर्मचाऱ्याला देता येऊ शकते.
  • जर तुम्ही लाइफ सर्टिफिकेट फॉर्म भरून पाठवलेत, तर निवृत्ती वेतनधारकांना स्वतः बँकेत किंवा त्या कार्यालयात जावे लागणार नाही.
  • जर संबंधित अधिकाऱ्याने त्या फॉर्मवर स्वाक्षरी केली तर ती स्वीकारली जाईल.

 

ऑनलाईन सुविधा

  • निवृत्तीवेतनधारक जीवन प्रमाण पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करू शकतात.
  • https://youtu.be/nNMIkTYqTF8 प्रमाणपत्र सादर करण्याची पद्धत या लिंकवर दिलेली आहे.
  • इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीपीबी) घरीच लाईफ सर्टिफिकेट मिळवण्याची सेवा सुरू केली आहे.
  • या कामात पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक मदत करत आहेत.
  • या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही Google Play store वरून Postinfo APP डाउनलोड करू शकता.
  • https://youtu.be/cERWM_U7g54 हे अॅप कसे कार्य करेल ते या लिंकवर दिले आहे.

 

लिव्हिंग सर्टिफिकेट सादर करण्यासाठी, सरकार १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनाही सहभागी करवत आहे, ज्या १०० मोठ्या शहरांमध्ये घरपोच सेवा देखील प्रदान करतील. पेन्शनरला डोअरस्टेप बँकिंग (DSB) मोबाईल अॅप, https://doorstepbanks.com/ आणि https://dsb.imfast.co.in/doorstep/login किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारे सेवा मिळेल:- 18001213721, 18001037188.

 

१ ऑक्टोबर पासून प्रमाणपत्र जमा करा

  • टपाल विभागाच्या आदेशानुसार, यावर्षी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जीवित प्रमाणपत्र १ ऑक्टोबर २०२१ पासून जमा करणे सुरू होईल.
  • निवृत्तीवेतनधारक दोन महिने येथे आपले प्रमाणपत्र सादर करू शकतील.
  • १ऑक्टोबरपासून, ८० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे पेन्शनधारक त्यांचे लाईफ सर्टिफिकेट देऊ शकतात.
  • त्यांना ते पोस्ट ऑफिसच्या जीवनप्रदान केंद्रात किंवा ऑनलाइन जमा करावे लागेल

 

काय आहे जीवनप्रदान केंद्र

  • जीवनप्रदान केंद्र निवृत्तीवेतनधारकांच्या सोयीसाठी सर्व टपाल कार्यालयांच्या मुख्यालयात उघडण्यात आली आहेत.
  • त्यांच्या मदतीने निवृत्तीवेतनधारक त्यांचे लाईफ सर्टिफिकेट नोंदवत होते.
  • यामुळे त्यांची पेन्शन येत राहते.
  • ८० वर्षांपेक्षा कमी वयाचे पेन्शनर १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट देऊ शकतील.

 


Tags: Google Play Storelive certificate officerspensionersइंडिया पोस्ट पेमेंट्स बँकजीवनप्रदान केंद्र
Previous Post

व्यावसायिक करिअरची नवी संधी…ईव्ही चार्जिंग स्टेशन!

Next Post

हरणांसाठी २० वर्षांपासून ४५ एकर जमीन रिकामी सोडणारा शेतकरी!

Next Post
deer

हरणांसाठी २० वर्षांपासून ४५ एकर जमीन रिकामी सोडणारा शेतकरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!