मुक्तपीठ टीम
एलॉन मस्क म्हटलं की आठवतात नव्या नव्या संकल्पना. कधीही न डगमगता ते आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी वाट्टेल ते करतात. ते नेहमीच त्यांच्या प्रगतशील उद्योजकतेच्या संकल्पनामुळे चर्चेत असतात. भारतीय आयटी कंपनीत कार्यरत असलेला प्रणय पाटोळे हा मराठी आयटी प्रोफेशनल सोशल मीडियावर मस्क यांच्या संपर्कात असतो. पाटोळेंच्या प्रश्नांना मस्क प्रतिसाद देतात. पाटोळेंनी त्यांना प्रश्न विचारला आणि इलॉन मस्कनी त्यांना उत्तरही दिलं. नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा मस्क विचार करत आहेत.
Free speech is essential to a functioning democracy.
Do you believe Twitter rigorously adheres to this principle?
— Elon Musk (@elonmusk) March 25, 2022
२०१८ पासून ट्विटरवर मस्कच्या संपर्कात असलेल्या पाटोळे यांनी त्यांना विचारले होते की, “तुम्ही एक नवीन ऑनलाइन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार करणार का? मुक्त स्त्रोत म्हणजे ओपन सोर्स अल्गोरिदमसह हे व्यासपीठ तयार करून, भाषण स्वातंत्र्य दिले पाहिजे आणि या स्वातंत्र्याला प्राधान्य दिले पाहिजे. हे व्यासपीठ प्रचाराचे माध्यम बनण्यापासून टाळा. आज अशा व्यासपीठाची गरज आहे.
DO IT ELON! pic.twitter.com/mctWFAtEIM
— Pranay Pathole (@PPathole) March 27, 2022
सहमती दर्शवत मस्क यांनी यावर विचार करण्याची सूचना केली. त्यांनी नवीन व्यासपीठ तयार केल्यास, अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्याचे मठाधिपती असल्याचा दावा करणार्या विद्यमान सोशल मीडिया कंपन्यांना आव्हान उभे करू शकतात. ट्विटर, मेटा कंपनीचे फेसबुक आणि इंस्टाग्राम, अल्फाबेट कंपनीचे गुगल आणि यूट्युब इत्यादी प्रमुख आहेत.
ट्विटरवर मस्क यांचे आक्षेप!
- मस्क यांनी ट्विटरवर २५ मार्च रोजी पोल घेतला.
- त्यांनी ट्विटरकरांना विचारली की, ट्विटर लोकशाहीसाठी आवश्यक असलेल्या भाषण स्वातंत्र्याच्या तत्त्वांचे पूर्णपणे पालन करते का?
- सुमारे २१ लाख ट्विटरकरांनी त्यावर मतदान केले.
- ७० टक्क्यांहून अधिक लोक म्हणाले की ट्विटर तसे करत नाही.
परिणामांबद्दल सूचित केले होते
- पोलच्या निकालातून महत्त्वपूर्ण परिणाम होतील, त्यामुळे काळजीपूर्वक मतदान करा, असा इशारा मस्क यांनी दिला.
- निकाल आल्यावर ट्विटर हे टाउन-स्क्वेअर साइटसारखे आहे, असे सांगण्यात आले.
- अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तत्त्वे पाळली गेली नाहीत, तर ते लोकशाहीसाठी घातक आहे.