Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शाहू महाराज समाधी सुशोभीकरणासाठी ५ कोटींचा निधी

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

January 8, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
eknath shinde cabinet minister

  • शाहू मिलमधील शाहू स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय

 

  • महालक्ष्मी मंदिर परिसर विकास आणि रंकाळा परिसर सुशोभीकरणासाठी निधी

 

  • महापालिका क्षेत्र हद्दवाढीबाबत सरकार सकारात्मक

 

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कोल्हापूर शहरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीच्या दुसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरण कामासाठी ५ कोटींचा निधी देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केली. याशिवाय शाहू महाराजांच्या शाहू मिलमधील  प्रस्तावित स्मारकासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रश्नही महत्त्वाचा असून त्याबाबतही सरकार सकारात्मक पावले उचलेल, असे ते म्हणाले.

 

कोल्हापूर महापालिका व जिल्ह्यातील विविध नगर परिषदांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी श्री. शिंदे शुक्रवारी  कोल्हापूर येथे आले होते. महापालिका मुख्यालयात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत श्री. शिंदे यांनी महालक्ष्मी मंदिर परिसर विकास आणि रंकाळा तलाव परिसर सुशोभीकरण या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगितले. बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठीही प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत, नगरविकास विभाग सर्वतोपरी मदत करेल, असेही ते म्हणाले. या प्रसंगी राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक, आमदार चंद्रकांत जाधव, महेश जाधव, योगेश जाधव, महापौर निलोफर आजरेकर, प्रधान सचिव महेश पाठक, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.

 

राज्यात अलीकडेच लागू करण्यात आलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीचे सादरीकरणही यावेळी झाले. राज्यात झपाट्याने नागरीकरण होत असून शहरांचा विस्तार होत आहे. या शहरांचा नियोजनबद्ध रितीने विस्तार व्हावा आणि शहरांच्या सुसूत्र विकासाला चालना मिळावी, यासाठी राज्य सरकारने मुंबईवगळता राज्यभरात एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाइड डीसीपीआर) लागू केली आहे. कोल्हापूरसारख्या इतिहासाचा उज्ज्वल वारसा असलेल्या शहराने या नियमावलीचा लाभ नव्या सहस्त्रकाशी नाते जोडले पाहिजे, असे प्रतिपादन श्री. शिंदे यांनी केले. कन्स्ट्रक्शन टीडीआरचा, तसेच एआर पॉलिसीचा प्रभावी वापर करून महापालिकेचा निधी खर्च न करता आरक्षणे विकसित करून मोठ्या सुविधांची निर्मिती करता येईल, असेही ते म्हणाले.

 

शिंदे म्हणाले की, एकात्मिक डीसीपीआरमध्ये बांधकाम क्षेत्राला चालना देण्याबरोबरच सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक तरतुदी आहेत. १५० चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावर स्ववापरासाठी घर बांधायचे असेल तर बांधकाम परवान्याची अट रद्द करण्यात आली आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट आणि एसआरए योजना राज्यभरात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे धोकादायक, बेकायदा बांधकामे, तसेच झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करून सर्वसामान्यांना हक्काचे सुरक्षित घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूर, सांगली परिसराला गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार पुराचा फटका बसला आहे. ब्लु लाईन बाबत लोकप्रतिनिधीनी केलेल्या सूचनेचा विचारही केला जाईल, असेही ते म्हणाले.

 


Tags: Cabinet MinisterEknath ShindemuktpeethShivsenaUrban Developmentएकनाथ शिंदेनगर विकास मंत्रीमुक्तपीठराजर्षी शाहू महाराजशिवसेना
Previous Post

“मुठभरांचे आंदोलन संबोधून चंद्रकांत पाटलांकडून शेतकऱ्यांचा अपमान”

Next Post

कंगना रणौत, बहिण रंगोलीची देशद्रोहाच्या गुन्ह्या प्रकरणी दोन तास चौकशी

Next Post
kangana

कंगना रणौत, बहिण रंगोलीची देशद्रोहाच्या गुन्ह्या प्रकरणी दोन तास चौकशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!