मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड आज देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ देतील. न्यायमूर्ती चंद्रचूड हे १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत दोन वर्षांसाठी या पदावर असतील. ते न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची जागा घेतील, ज्यांनी ११ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली होती.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा कार्यकाळ-
- न्यायमूर्ती चंद्रचूड यांना जून १९९८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते आणि त्याच वर्षी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
- ते २९ मार्च २००० ते ३१ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
- त्यानंतर त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- १३ मे २०१६ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली.
ऐतिहासिक निकाल देणार्या अनेक घटनापीठांचा भाग-
- ऐतिहासिक निकाल देणार्या अनेक घटनापीठांचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा ते भाग राहिले आहेत.
- यामध्ये अयोध्या वाद, आयपीएसच्या कलम ३७७ अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी घोषित करणे, आधार योजनेच्या वैधतेशी संबंधित प्रकरणे, शबरीमाला प्रकरण, भारतीय नौदलात महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी अधिकार देणे आदींचा समावेश आहे.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडीलही सरन्यायाधीश होते-
- न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला होता.
- न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सुमारे सात वर्षे आणि चार महिने मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले.
- सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील सीजेआयचा त्यांचा सर्वात मोठा कार्यकाळ होता.
- २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ पर्यंत ते सरन्यायाधीश होते.
- न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी राष्ट्रीय राजधानीतील सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए ऑनर्स केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून एलएलबी केले.
- त्यानंतर त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूल, यूएसए मधून एलएलएम आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली.