डॉ. अभय तिडके
महामारीचा सामना करत असताना लोकांना अनेक महत्त्वपूर्ण धडे मिळाले आणि त्यांनी जीवनातील त्यांच्या प्राधान्यांमध्ये बदल केले. ते कोरोनाविषाणूच्या प्रादुर्भावामुळे घाबरून गेले होते, तरीदेखील या स्थितीने त्यांना काहीसा विचार करण्यासाठी वेळ दिला आणि त्यांनी जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्टीला अधिक महत्त्व देण्यास सुरूवात केली, ती म्हणजे हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासह आरोग्यदायी जीवन जगणे. दशकांपासून कार्डियोव्हॅस्कुलर डिसीजचा (सीव्हीडी) सामना करत असलेल्या भारतीयांना हा साक्षात्कार अधिक प्रकर्षाने जाणवला आहे.
सर्व सीव्हीडींपैकी कोरोनरी आर्टरी डिसीज (सीएडी) भारतातील मोर्बिडीटी व मृत्यूसाठी प्रमुख कारण बनले आहे. हे तथ्य करण्यात येणाऱ्या एंजियोप्लास्टीच्या वाढत्या प्रमाणामधून दिसून येऊ शकते. २०१६ मध्ये भारतात ४७८,७७० कोरोनरी इंटरवेन्शन्स करण्यात आले. चांगली बातमी अशी आहे की, सीएडीच्या वाढत्या केसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताने आज ड्रग एल्युटिंग स्टेण्ट्स सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा अवलंब केला आहे, जी रूग्णांना उत्तम जीवनाचा दर्जा देतात. चला तर मग, या आजाराबाबत, तसेच त्याचे निदान व उपचारांबाबत माहिती करून घेऊया.
कोरोनरी आर्टरी डिसीज बाबत
प्लाक्स नावाचा घटक असलेले कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे हृदयातील धमन्या अरूंद होतात, तेव्हा सीएडी आजार होतो. या आजारामध्ये हृदयाला रक्त, ऑक्सिजन व पोषक घटकांच्या पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो. शेवटी हृदयाला रक्तपुरवठा कमी प्रमाणात झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, छातीमध्ये दुखणे किंवा एंजिना अशा त्रास होऊ शकतो आणि संपूर्ण ब्लॉकेजमुळे हार्ट अॅटॅक येऊ शकतो.
अशी चिन्हे व लक्षणे जाणवल्यास थोडा देखील विलंब न करता डॉक्टरांना भेट द्या. डॉक्टर वैद्यकीय इतिहासासंदर्भात प्रश्ने विचारतील, शारीरिक तपासणी करतील आणि काही रक्तचाचण्या किंवा नैदानिक चाचण्या करण्यास सांगतील- जसे इलेक्ट्रोकार्डियोग्राम, एन्कोकार्डियोग्राम, एक्सरसाइज स्ट्रेस टेस्ट, न्युक्लियर स्ट्रेस टेस्ट, कार्डियक कॅथेटरायझेशन व एंजियोग्राम आणि कार्डियक सीटी स्कॅन.
क्लॉग्ड कोरोनरी आर्टरीचा उपचार कसा केला जातो?
नैदानिक चाचण्यांच्या निष्पत्तींवर आधारित डॉक्टर उपचार पद्धतींचा सल्ला देतात. रूग्णांना जीवनशैली बदल करण्याचा, तसेच आवश्यक असल्यास औषधे व वैद्यकीय उपचार पद्धती बदलण्याचा सल्ला दिला जातो. धूम्रपान टाळणे, आरोग्यदायी आहाराचे सेवन, नियमितपणे व्यायाम, वाढलेले वजन कमी करणे आणि तणाव कमी करणे असे विशिष्ट जीवनशैलीसंबंधित उपाय सीएडीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये मदत करतात.
गंभीर ब्लॉकेजेसचा उपचार करण्यासाठी एंजियोप्लास्टी व स्टेण्ट प्लेसमेंट अशा विशिष्ट शस्त्रक्रियांची गरज असते. स्टेण्ट्स बंद झालेल्या धमन्या पूर्ववत करण्यासाठी वापरल्या जाण-या लहान एक्स्पाण्डेबल ट्यूब्स आहेत, ज्या धमनीचे कार्यसंचालन पूर्ववत करतात, छातीमध्ये दुखणे यांसारखी लक्षणे कमी करतात आणि हार्ट अॅटॅक येण्याच्या शक्यतेला प्रतिबंध करतात. अशा स्टेण्ट्सना कार्डियक किंवा कोरोनरी स्टेण्ट्स म्हटले जाते आणि हार्ट स्टेण्ट इम्प्लाण्टेशनच्या शस्त्रक्रियेला पर्क्युटेनिअस कोरोनरी इंटरवेन्शन (पीसीआय) किंवा एंजियोप्लास्टी म्हटले जाते. सीएडीचा उपचार करण्यासाठी सामान्यत: तीन प्रकारच्या स्टेण्ट्सचा वापर केला जातो – ड्रग एल्युटिंग स्टेण्ट (डीईएस), बायोरिसोर्बेबल व्हॅस्कुलर स्कॅफोल्ड आणि बेअर मेटल स्टेण्ट (बीएमएस).
रूग्णांसाठी ड्रग एल्युटिंग स्टेण्ट्स एक वरदान
आज बहुतांश डॉक्टर्स अनेक रूग्णांसाठी सुरक्षित व गुणकारी असलेल्या डीईएसच्या नवीन व सुधारित व्हर्जन्सना प्राधान्य देतात. उच्च दर्जाच्या डीईएसमुळे बीएमएसच्या तुलनेत भविष्यात ब्लॉकेज होण्याची शक्यता खूपच कमी आहे. डीईएस हे एक मेटल स्टेण्ट आहे, ज्यामध्ये औषधाचे कोटिंग असते. स्टेण्टच्या आतील भागामध्ये किंवा कडांवर अतिरिक्त उती निर्माण झाल्यामुळे एंजियोप्लास्टीनंतर देखील धमनीच्या कार्यामध्ये वारंवार अडथळे निर्माण करणारे रेस्टेनोसिसचे प्रतिबंध करण्यासाठी डीईएस ओळखले जाते. नवीन डीईएस प्लॅटिनम-क्रोमिअम अलॉईज सारख्या उच्च दर्जाच्या धातूंपासून बनवण्यात आले आहेत, जे शक्ती कमी न करता उत्तम स्थिती असण्याची खात्री देतात. या नवीन डीईएसमधील ड्रग मॉलीक्युल्स बाहेरील बाजूवर काळजीपूर्वक स्थित करण्यात आले आहेत, ज्यामुळे बाहेरील परिणाम कमी असण्याची खात्री मिळते. ड्रग मॉलीक्यूल्सना स्टेण्ट मेटलशी जोडणारे बायोपॉलिमर डिझाइनमधील सुधारणा शरीराची स्टेण्टप्रती इम्युनी रिअॅक्शन कमी होण्याची खात्री देते, ज्यामुळे फेल्युअर होण्याची शक्यता कमी होते. अमेरिकन फॅमिली फिजिशियन मेडिकल जर्नलमधील संशोधनाने निदर्शनास आणले की, स्टेण्टशिवाय एंजियोप्लास्टी करण्यात आलेल्या जवळपास ४० टक्के लोकांना रेस्टेनोसिसचा त्रास झाला. बीएमएस प्रत्यारोपण झालेल्या रूग्णांमध्ये हे प्रमाण जवळपास ३० टक्के होते, तर डीईएसचा अवलंब केलेल्या रूग्णांमध्ये हे प्रमाण १० टक्क्यांहून कमी होते.[1] आता कोरोनरी स्टेण्टिंगच्या सर्व संकेतकांच्या बाबतीत डीईएसने बीएमएसला मागे टाकले आहे.
पीसीआयदरम्यान डॉक्टर हात किंवा मांडीवर चीर पाडत निमुळत्या टोकावर बलून व स्टेण्टसह लहान कॅथेटर समाविष्ट करतील. ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफीसारख्या प्रगत इमेजिंग तंत्रांचा वापर करत कॅथेटर शरीरामधील अरूंद धमनीमध्ये समाविष्ट करण्यात येईल. त्यानंतर बलून फुगून प्लाकला आतील बाजूस सरकवेल. बलून फुगत जाऊन स्टेण्ट वाढेल आणि धमनी खुल्या होतील. स्टेण्ट योग्यरित्या बसल्याची खात्री घेतल्यानंतर डॉक्टर बलून व कॅथेटर काढून टाकतील. डीईएस उपचार केलेल्या व्यक्तींना कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी सारख्या अधिक इन्वेसिव्ह शस्त्रक्रियांची गरज भासणार नाही.
स्टेण्टसह राहणीमान
डीईएस शस्त्रक्रियेदरम्यान वापरल्यानंतर ते धमनीवर औषधोपचार करते, ज्यामुळे स्टेण्ट व रेस्टेनोसिसमधील उतींवर जखम होण्याला प्रतिबंध करेल. ही संपूर्ण शस्त्रक्रिया कमी गुंतागुंतीची असून जलद रिकव्हरी आणि रूग्णांचा जीवनाचा दर्जा उत्तम असण्याची खात्री मिळते. शस्त्रक्रियेनंतर स्टेण्टसह रूग्णांना वेगळे जीवन जगावे लागत नाही. आरोग्यदायी आहाराचे जीवन, सक्रिय राहणे आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधोपचारांचे पालन करणे हीच खबरदारी घ्यावी लागते.
नवोन्मेष्कारी प्रगतीच्या दिशेने वाटचाल: भारताची स्थिती?
भारतातील वैद्यकीय डिवाईस इंडस्ट्री वर्ष २०२५ पर्यंत ५० बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. सध्या २४ वैद्यकीय डिवाईस आहेत, ज्यांना भारत सरकाने अधिसूचित करण्यासोबत औषधे म्हणून नियमित केले आहे. यापैकी डीईएससह चार वैद्यकीय डिवाईसेस नियोजित वैद्यकीय डिवाईसेस आहेत आणि त्यांच्या किंमती देखील नियंत्रणात आहेत.
भारताने रूग्णांना प्रगत उपचार पद्धती देण्यामध्ये लक्षणीय प्रयत्न केला आहे. पण प्रगत उपचार पद्धतीत संपन्न होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानांकरिता प्रबळ धोरणे व सर्वांगीण वातावरणाचा अभाव रूग्णांपर्यंत प्रगत उपचार पोहोचण्यामधील प्रमुख अडथळा आहे. म्हणूनच भारताने आरोग्यसेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्याची आणि सर्वांसाठी ती उपलब्ध करून देण्याची खात्री घेण्याची गरज आहे.
(डॉ. अभय तिडके हे मुंबईतील लोकमान्य टिळक मनपा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात असोसिएट प्रोफेसर आणि कन्सल्टण्ट इंटरवेन्शनल कार्डियोलॉजिस्ट आहेत.)