Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“वाघ आणि वाळवी यातील फडणवीसांना फरक कळू नये, हे दुर्दैव!”

सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांची तोफ धडाडली!

September 28, 2021
in घडलं-बिघडलं
0
kantilal kadu

मुक्तपीठ टीम

स्थानिक, भूमिपुत्रांच्या संसारावर नांगर फिरवून परप्रांतीयांचे लाड पुरवणार्‍या नेत्यांना आता धडा शिकवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करून समाजाला लागलेली वाळवी आणि वाघ यातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फरक कळू नये हे दुर्दैव आहे, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी तोफ डागली.

रोडपाली येथील मार्बल मार्केट येथील प्रकल्पग्रस्त स्थानिक टेम्पो चालक, मालक सामाजिक संघाच्या नामफलकाचे अनावर संघटनेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या हस्ते केले, त्यावेळी त्यांनी प्रस्थापितांवर टीकेची झोड उठवली.

आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि गटनेते परेश ठाकूर यांच्या घरात दोन वेळा खासदारकी, तीन वेळा आमदारकी, दोन वेळा नगर परिषद आणि महापालिकेची सत्ता अशी ३०-३५ वर्षे सत्ता उपभोगूनही पनवेलसह परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळू शकल्या नाहीत, याचा आता विचार करण्याची वेळ प्रत्येक नागरिकावर येवून ठेपली असल्याचे सांगून कडू यांनी सत्तापिपासूंवर सडकून टीका केली.

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या आणि आगरी समाजाच्या नावाने राजकारण करणार्‍यांनी समाजाला खड्यासारखे बाजूला केले. अन्यथा अडीच वर्षानंतर आगरी समाजाचा महापौर बसवता आला असता. पण तसे करण्याची ठाकूरांची मानसिकता नसल्याचे कडू यांनी सांगितले. विमानतळ आंदोलनात आघाडीवर राहिलेले उपमहापौर जगदीश गायकवाड सध्या आहेत कुठे? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

 

kantilal kadu

महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. टक्केवारीशिवाय कामे होत नाहीत. झालेली कामेही गुणात्मक, दर्जात्मकदृष्ट्या अतिशय सुमार दर्जाची आहेत. नियोजनाचा पूर्ण अभाव असल्याने मार्बल मार्केटच्या रस्त्यांसह इतर शहरातील रस्ते खड्ड्यात हरवले आहेत, असे त्यांनी स्पष्ट करून विरोधी पक्ष नेते ग्रामपंचायत सदस्य असल्यासारखे वागतात. त्यांना अजून त्यांची जबाबदारी कळाली असे काम त्यांच्या हातून होताना गेल्या चार वर्षात दिसले नाही.

स्थानिक व्यावसायिकांना सोबत घेवून गुजराती, मारवाडी, भैय्यांनी व्यवसाय करावा, उगीच दादागिरी कराल तर ती परवडणारी नाही, असा इशारा देताना मार्बल व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण लक्षात ठेवून स्थानिक-परप्रांतीयांमध्ये कोंबडं झुंजवावे, असा कडक इशारा कडू यांनी देताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

पनवेलमधील एका नेत्याला जेलमध्ये पाठविले आहे. अजून खूप काम बाकी आहे. अनेकांना जेलमध्ये पाठवून पनवेलच्या राजकारणातील घाण काढण्याचे काम तुम्हा-आम्हाला नजीकच्या काळात करावे लागणार आहे, असाही सूचक इशारा कडू यांनी दिला.

यावेळी भाजपा नेते यशवंतशेठ ठाकूर, दुसरे भाजप नेते बुधाजीशेठ ठाकूर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि राष्ट्रवादीचे नेते महादूशेठ पाटील, शेकाप युवा नेते विजय पाटील, संघर्ष समितीचे तळोजे विभागीय अध्यक्ष सुनील भोईर, मार्बल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथशेठ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाला पनवेल संघर्ष समितीचे पनवेल शहर अध्यक्ष गणेश वाघिलकर, नावडे विभागीय अध्यक्ष योगेश पगडे, वावंजे विभागीय अध्यक्ष डॉ. हेमंत पाटील, रंगकर्मी मोरे, नेरे विभागीय अध्यक्ष सचिन पाटील, लाईन आळी विभागीय अध्यक्ष हरेश पाटील यांच्यासह गोपीनाथ शंकर कडके, महेश शशिकांत कुष्टे, बामेश गौतम पाटील, मार्बल मार्केटचे अध्यक्ष रघुनाथ शेठ, पद्माकर पाटील, विजय भोईर, जनार्दन पाटील, मंगल फडके, नाका अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष विलास पाटील, सचिव राहूल पगडे, सहसचिव गणेश भोईर, खजिनदार उमेश फडके, सहखजिनदार चंद्रकांत भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजप नेत्यांनी केले कांतीलाल कडू यांचे तोंडभरून कौतुक

कांतीलाल कडू हे वेगळं रसायन आहे. अतिशय प्रामाणिक पत्रकार आणि स्पष्ट वक्ता असल्याने त्यांचा शासकीय, निमशासकीय अधिकार्‍यांवर अंकुश आहे, त्यांचा आदरयुक्त दरारा आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला तेच न्याय देवू शकतात. त्यांच्या नावानेच येथील पन्नास टक्के समस्या सुटल्या आहेत, अशा शब्दात भाजप नेते बुधाजीशेठ ठाकूर यांनी कांतीलाल कडू यांचे कौतुक केले. तर समाजाला ज्या नेतृत्वाची गरज आहे, ते नेतृत्व कांतीलाल कडू यांच्यात असल्याने सामाजिक न्यायीकरणाच्या येथील कक्षा रुंदावताना दिसत असल्याचे भाजप नेते यशवंतशेठ ठाकूर यांनी सांगत कडू यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला.

Tags: BJPpanvelprashant thakurआमदार प्रशांत ठाकूरकांतीलाल कडूपनवेलभाजपा
Previous Post

कोरोनरी आर्टरी डिसीजच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी प्रगत तंत्रज्ञानांचा अवलंबाचा मार्ग

Next Post

“विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या समस्यांचे समाधान होईपर्यंत सर्वस्तरावर पाठपुरावा करणार”:  सुनील केदार

Next Post
sunil kedar

"विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या समस्यांचे समाधान होईपर्यंत सर्वस्तरावर पाठपुरावा करणार":  सुनील केदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!