मुक्तपीठ टीम
क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या वर्षी ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन, पॉइंट-ऑफ-सेल आणि अॅपमधील व्यवहारांमध्ये वापरलेला सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्ड डेटा एका यूनिक टोकनसह बदलणे अनिवार्य केले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३० सप्टेंबर अंतिम तारीख असणार
- या योजनेला टोकनायझेशन सिस्टम असं ही म्हणतात.
- या सिस्टममधील बदलाबाबत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, या बदलामुळे कार्डधारकांना पेमेंट करणे सोयीचे होईल.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, डेबिट आणि क्रेडिट कार्डचा डेटा वेगवेगळ्या टोकनसह बदलल्याने कार्डधारकांना फसवणुकीपासून संरक्षण मिळेल.
- या अंतर्गत, कार्डधारकांचे सर्व तपशील एनक्रिप्टेड टोकनच्या स्वरूपात संग्रहित केले जातील. यामुळे ग्राहकांचे पेमेंट अधिक सुरक्षित होईल.
टोकनायझेशनमुळे ऑक्टोबरपासून नियम होणार बदल!
- रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, १ ऑक्टोबरपासून कार्ड ऑन फाइल टोकनायझेशन नियम लागू होत आहे.
- फसवणुकीची वाढती संख्या लक्षात घेता, मूळ कार्ड डेटा एन्क्रिप्टेड डिजिटल टोकनसह बदलणे अनिवार्य केले आहे.
- या बदलामुळे ऑनलाइन व्यवहारातील फसवणुकीची समस्या दूर होणार आहे. तसेच, कार्डमधील माहिती देखील लीक होणार नाही.
- टोकनायझेशनसाठी ग्राहकाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
टोकनायझेशन करण्याच्या सोप्या टिप्स…
- कोणत्याही ई-कॉमर्स व्यापारी वेबसाइट किंवा अॅपवर लॉग इन करा.
- त्यासोबत कार्ड निवडा. कार्डवरील माहिती देखील भरा.
- त्यानंतर क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती भरा.
- मग तुमचे कार्ड सुरक्षित करा.
- त्यानंतर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्ड सुरक्षित करण्याचा पर्याय निवडा.
- यानंतर एक OTP मिळेल, जो भरावा लागेल.
- त्यानंतर क्रिएटवर क्लिक करा. यासह कार्ड डेटा आता टोकनमध्ये रूपांतरित होईल.
- यानंतर, जेव्हा पेमेंट करण्यासाठी त्याच वेबसाइट किंवा प्लॅटफॉर्मवर जाता तेव्हा सेव्ह केलेल्या कार्डचे शेवटचे ४ अंक दिसतात. हे टोकन असते.