मुक्तपीठ टीम
कोविन पोर्टलेने एका नव्या अॅप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस (API) ला लाँच केलं आहे. ज्याला नो यूअर कस्टमर्स / क्लाएंट वॅक्सिनेशन स्टेटस किंवा KYC-VS नाव दिलं गेलं आहे. याच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीची लसीकरणाबाबतची माहिती कळू शकणार आहे. परिणामी रेल्वे प्रवास, मॉल किंवा हॉटेलमध्ये प्रवेश देताना संबंधित व्यक्तीच्या लसीकरणाबाबत माहिती मिळाल्यामुळे निर्णय घेणे सोपे जाणार आहे.
देशभरात सध्या कोविन अॅपच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवली जात आहे. सोबतच लसीकरण केंद्रांवर वॉक-इन सुविधाही पुरवण्यात आली आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रासाठी कोविन अॅप असणं आवश्यक आहे.
कसं काम करणार को-विन API?
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविन अॅपला अपग्रेड केलं आहे.
- API च्या मदतीने कोणतीही संस्था, संघटना, दुकानातले कर्मचारी, ग्राहक यांच्या
- लसीकरणासंदर्भातली माहिती त्वरित मिळेल.
- आतापर्यंत लसीकरण प्रमाणपत्र हे डाऊनलोड करावं लागत होतं. किंवा मोबाईलवर
- वेगळ्या फाईलमध्ये सेव्ह करावं लागत होतं.
- मात्र आता या नव्या अॅपनुसार नागरिकांना आपलं नाव आणि फोन नंबरच सांगावं लागणार आहे.
- यातून प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणाबाबतची माहिती कळणार आहे.
- व्यक्ती किंवा ग्राहकाचं नाव या अॅपवर टाकल्यावर एक ओटीपी येईल.
- हा ओटीपी टाकल्यानंतर संबंधित व्यक्तीची लसीकरणासंदर्भातली माहिती मिळेल.
को-विन API नेमकी कोणती माहिती असणार?
- या अॅपमध्ये ३ प्रकारची माहिती असेल.
- व्यक्तीचं लसीकरण झालेलं नाही.
- पहिला डोस झाला आहे.
- दोन्ही डोस झाले आहेत.
- अशा स्वरुपात ३ पॉईंट्समध्ये माहिती कळणार आहे.
- API अंतर्गत नागरिकांच्या प्रायवसीचीही काळजी घेतली गेली आहे.