Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

कोमसापचे महिला साहित्य संमेलन, रसिकांच्या गर्दीत साहित्य चर्चा, काव्य प्रतिभा!

June 14, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
KOMSAP

गौरव संतोष पाटील / पालघर

कोकण मराठी साहित्य परिषदेचे सहावे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन पालघर येथे नुकतेच पार पडले. कोकणाच्या उत्तर भागातील साहित्य रसिकांनी संमेलनाला चांगला प्रतिसाद दिला. त्यात स्थानिक साहित्यप्रेमींनी आयोजनात कसलीही कसर सोडली नसल्याने सोनोपंत दांडेकर महाविद्यालय येथे दिमाखदार साहित्य सोहळा संपन्न झाला.

COMSAP

संमेलनाचा शुभारंभ साहित्य दिंडीने झाला. उषा परब यांनी संमेलनाचे प्रास्ताविक करीत साहित्य दिंडी तळागाळापर्यंत पोहचली पाहिजे असा कोमसापचा आग्रह असल्याची भूमिका मांडली. ग्रामीण भागातील स्त्रिया शहरात कमी जातात म्हणून संमेलन दारी आणण्याचा प्रयत्न या महिला संमेलनाने केला आहे. असे सांगून महिला संमेलन सीमोल्लंघन करेल अशी आशा व्यक्त केली.

COMSAP

संमेलनाध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका व संपादिका मोनिका गजेंद्रगडकर यांनी स्त्री साहित्याचा मागोवा आपल्या भाषणातून घेतला व उपस्थित महिलांशी संवाद साधला. महिला लेखिकांचे साहित्य पूर्वग्रह व संकुचित दृष्टिकोनातून पाहिले जात असून महिलांना आपल्या स्वतःशी व काळोखाशी लढाई करावे लागत आहे. पेच व त्राण सहन करणाऱ्या महिलांचे साहित्य सार्वत्रिक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे असून महिलांनी लिखाणात प्रयोगशीलता अवलंबायला हवी असही त्या म्हणाल्या.

याप्रसंगी उद्घाटक म्हणून विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तर प्रमुख अतिथी होत्या. त्यांनी महिलांचे साहित्य कमी प्रमाणात वाचले जात असल्याचे निदर्शनास आणून हे प्रमाण वाढविण्याची गरज असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. महिलेला सहजपणे साहित्य निर्मिती करण्यासाठी पोषक वातावरण तयार करायला हवे तसेच ग्रामीण भागातील महिलांमध्ये साहित्यिक चळवळ राबवण्यासाठी महिलांसाठी चर्चासत्र, बचत गटांच्या माध्यमातून वाचनालय इत्यादी उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रियांना लिखाणासाठी वेळ मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यांना त्याची सर्जनशीलता जपणे कठीण जाते हे वास्तव आहे. मनाची एकाग्रता भंग झाल्यानंतर देखील सर्जनशील लिखाण करण्याची ताकत महिलांमध्ये असल्याचे सांगत महिलांना समाजामध्ये निर्भयतेने वावरता आले तर अधिक प्रमाणात साहित्य निर्मिती होईल. असे डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या.

 

अभिनेत्री-लेखिका मधुरा वेलणकर-साटम उपस्थित होत्या. लहानपणापासून चौकटीत राहणाऱ्या महिला वर्गाने पुढील पिढी बदलावी म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत असे सांगत मधुरा वेलणकर यांनी आपण पुढच्या पिढीला माणूस म्हणून वाढवायला हवे व जागवायला व्हायला हवे असे सांगितले.

उपस्थितांचे स्वागत स्वागताध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी केले. वटवृक्षाच्या झाडाखाली गवत देखील उगवत नाही पण मधुभाईंसारख्या वटवृक्षाखाली अनेक साहित्यिक तयार झाले आहेत असे सांगून मधुभाईंबद्दलचा आदर भाव व्यक्त केला. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर यांनी प्रास्ताविकामध्ये महिला साहित्य संमेलनाची गरज याविषयी भूमिका मांडली.

COMSAP

संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमात जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी समरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. मधुरा वेलणकर यांच्या मधुररव या ग्रंथाचे व ज्योती ठाकरे यांच्या मध्यावर या कवितासंग्रहाचे नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

महिलांचा सत्कार

या साहित्य संमेलनात राज्यातील नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सक्रिय कार्यकर्त्या डहाणू येथील वीणा माच्छी, पत्रकार निखिला म्हात्रे, धाडसी महिला पत्रकार पुरस्कार विजेत्या शितल करदेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा संतोष पाटील, ग्रामीण अर्थकारणात महिलांच्या सहभागासाठी गोदावरी अर्बन बँकेची स्थापना करून त्याच्या पाच राज्यांमध्ये शाखा उभारणाऱ्या राजश्री पाटील, कष्टकरी संघटनेच्या मधुबाई धोडी, शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या दीप एज्युकेशनच्या दीपा संखे यांचा समावेश आहे.

पाहा:


Tags: COMSAPgood newsKonkan Marathi Sahitya ParishadmuktpeethPalgharState Level Mahila Sahitya Sammelanकोकण मराठी साहित्य परिषदकोमसापचांगली बातमीपालघरमुक्तपीठराज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन
Previous Post

राज्यात १८८५ नवे रुग्ण, ७७४ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post

मोटू-पतलू शिकवणार कराविषयीचं सर्वकाही! अर्थमंत्रालयाचं कॉमिक्स बुक!!

Next Post
Finance Ministry Comics Book

मोटू-पतलू शिकवणार कराविषयीचं सर्वकाही! अर्थमंत्रालयाचं कॉमिक्स बुक!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!