मुक्तपीठ टीम
महागड रायगडाच्या मार्गावर पहारा देणाऱ्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे लिंगाणा. अवघड असा हा किल्ला पावसाळ्यात चढण्यासाठी अधिकच अवघड मानला जातो. परंतु, आव्हान स्वीकारलं, लक्ष्य ठरवलं की मराठी गडी माघारी फिरत नसतात. कितीही प्रतिकुलता असली तरी करून दाखवतातच. गिर्यारोहकांना तर आव्हान स्वीकारणं आवडतंच आवडतं. त्यामुळेच लिंगाणावर चढाईची मोहीम गिर्यारोहकांनी यशस्वी करून दाखवली. पावसाळी वातावरणात हा गड सर करणं सोपं नव्हतं. पण हिंमतीनं आणि संयमानं गड सर केला गेला.
लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. माणगड, सोनगड, महिन्द्रगड, लिंगाणा, कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात. कावळ्या, बोचेघोळ, निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड, शेवत्या, मढ्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते. बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे.
लिंगाण्याचे खडक ३१०० फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुणा शिल्लक आहेत.
साहसी गिर्यारोहकांची लिंगाणावर चढाई
- हा किल्ला पावसाळ्यात जाण्यासाठी फारच कठीण आहे.
- पण गिर्यारोहक शिलेदारांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा कऱण्यासाठी ही चढाई केला.
- लिंगाणा गडावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी ७५ फूट लांब भारताचा ध्वज फडकवला गेला.
- गिर्यारोहकांच्या आठजणांच्या टीमने हा किल्ला सर केला आहे.
- लिंगाणाच्या तीन हजार फूट उंचीपैकी हजार फूट उंची गिर्यारोहकांनी सर केली आहे.
मोहिमेत सहभागी साहसी गिर्यारोहक
अडव्हेंचर इंडिया रेकॉर्डधारक सागर नलावडे
पुरस्कृत शिखर संघ
- प्रशांत सूर्यवंशी
- शैलेश जाधव
- मोनीश येनपुरे
- सागर मोहिते
- कविता बोताळे
- शीतल जाधव
- अमिता सलियन
- अनिकेत जाधव
- विनायक पुरी
बॅकअप टीम
१) करण हंसकार – फोटोग्राफी – ड्रोन ऑपरेटर