Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवी मुंबई विमानतळ पुनर्वसन क्षेत्रातील भूखंडांच्या विकास परवानगी प्रक्रियेला सिडकोकडून गती

December 4, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
navi mumbai

मुक्तपीठ टीम

सिडकोने पुनर्वसन क्षेत्रातीसाठी भारतीय विमान प्राधीकरणाचे इमारतीच्या अनुज्ञेय उंचीसंदर्भात २०१५ साली सरसकट ना-हरकत प्रमाणपत्र (Blanket NOC) घेतले होते. सदर NOC ची वैधता २०२० मध्ये संपुष्टात आलेली होती, त्यामुळे मध्यंतरीच्या कालावधीत पुनर्वसन क्षेत्रात बांधकाम परवानगी तसेच भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याकरीता अर्जदारांना वैयक्तिकरित्या भारतीय विमान प्राधीकरणाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करावे लागत होते. सिडको प्रशासनाने भारतीय विमान प्राधीकरणाशी पाठपुरावा करून सदर ना-हरकत प्रमाणपत्रांची ची वैधता वाढविण्यात यश प्राप्त केले आहे.

 

एकूण सहा Blanket NOC पैकी {सेक्टर -१ (वडघर), सेक्टर २४(वहाळ १), सेक्टर २५ (वहाळ २), सेक्टर २५ ए (वहाळ ३) व पुष्पक नगर} या ५ क्षेत्रांना ना-हरकत प्रमाणपत्रांची वैधता जानेवारी ते मार्च २०२४ पर्यंत वाढवून मिळाली आहे. शिवाय आर-१ ते आर-५ (वडघर १) या क्षेत्राच्या ना-हरकत प्रमाणपत्राची वैधता वाढवून मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. सदर मंजुरी लवकरच अपेक्षित आहे.

 

विमानतळ पुनर्वसन व पुनःस्थापन क्षेत्राच्या विकासाला गती – डॉ. संजय मुखर्जी

याविषयी बोलताना सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी म्हणालेत, “सिडकोच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन व प्रकल्पबाधित नागरिकांच्या समस्या समजून घेऊन भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे ६ पैकी ५ पॉकेट्ससाठी ना-हरकत प्रमाणपत्रे पुनर्प्रमाणित करण्यात आली. या महत्वपूर्ण निर्णयामुळे विमानतळ पुनर्वसन व पुनःस्थापन क्षेत्राच्या विकासाला गती प्राप्त होईल यात शंका नाही.”

 

ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२१ मध्ये सदर वैधता वाढवून मिळाल्यानंतर सिडकोतर्फे पुनर्वसन व पुनःस्थापन क्षेत्रातील ७ प्रस्तावांना बांधकाम परवानगी देण्यात आली आहे तसेच ३४ प्रस्तावांमध्ये भोगवटा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २ डिसेंबर २०२० रोजीच्या अधिसूचना क्र. TPS-1818/CR- 238/18/Sec 37(1AA)/UD-13, अन्वये एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) सिडको क्षेत्रांकरीता लागु करण्यात आली आहे.

 

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या पुनर्वसन धोरणान्वये वितरीत करण्यात आलेले बहुतांशी भूखंड ४५०चौ.मी. क्षेत्रफळाच्या आतील असल्याने रो हाउस व सेमी डिटॅच (अर्ध अलिप्त) प्रकारच्या विकासासाठी पूर्वीच्या नियमावलीनुसार सदर भूखंडांवर एक बाजू किंवा दोन्ही बाजू सामाईक ठेवून परवानगी मिळावी यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांनी नगर विकास विभागास विनंती केली होती. सदर विनंतीस मंजुरी मिळाली असल्याने प्रकल्पबाधितांसाठी वाटप केलेल्या ४५० चौ.मी पर्यंत क्षेत्राच्या भूखंडामध्ये एक बाजू किंवा दोन्ही बाजू सामाईक ठेवून १३ मी. उंचीच्या मर्यादेत १.५ FSI सह (पार्किंग साठी च्या STILT मजल्याची उंची वगळता) परवानगी देण्यात येत आहे. शिवाय, एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या तरतुदींनुसार सिडकोच्या वसाहत विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त असल्यास वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकासह विकास परवानगी देण्यात येत आहे.

 

अफवांना बळी पडू नका!

सिडकोच्या वरील परिश्रमांमुळे पुनर्वसन विभागातील भूखंडांवर जलदरीत्या विकास परवानगी मिळण्याचा मार्ग सुखकर झालेला आहे. तथापि, सिडकोने विकास परवानगी देणे बंद केले आहे अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. तरी, सदर अफवांना बळी न पडता आवश्यक त्या कागदपत्रांसह बांधकाम परवानगीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा असे सिडकोतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

 


Tags: Airport Rehabilitation AreaCIDCOmuktpeethNavi Mumbai Airportनवी मुंबई विमानतळमुक्तपीठविमानतळ पुनर्वसन क्षेत्रसिडको
Previous Post

दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राज्यात विशेष मोहीम

Next Post

आधारकार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्याची सुविधा! कसं करायचं ते जाणून घ्या…

Next Post
Aadhaar card

आधारकार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्याची सुविधा! कसं करायचं ते जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!