मुक्तपीठ टीम
विश्व निर्मितीच्या बिग बँग थेअरीतील गॉड पार्टिकलचा शोध लावण्यासाठी युरोपातील फ्रांसमध्ये मोहिम राबवली जात आहे. चार वर्षांपूर्वी गॉड पार्टिकलच्या शोधासाठी वापरलेले ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ हे महायंत्र पुन्हा काम सुरु करणार आहे. या मोहिमेत जगभरातील निवडक शास्त्रज्ञांसह भारतीय शास्त्रज्ञही सहभागी असणार आहेत. सुमारे १५ अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या महास्फोटानंतर म्हणजे बिग बँगमधून विश्वाची निर्मिती झाली असे मानले जाते. युरोपीयन आण्विक संस्था ‘सर्न’ त्यातील गॉड पार्टिकलचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आता चार वर्षांनंतर ती मोहिम पुन्हा सुरू केली जाईल आणि १३.६ ट्रिलियन इलेक्ट्रॉनव्होल्ट्सची ऊर्जा काढली जाईल.
बिग बँग शोध मोहिमेत भारतीय शास्त्रज्ञांचाही सहभाग
- ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ हे महायंत्र बनवण्यासाठी भारताने पैसा दिला असून अनेक शास्त्रज्ञ या प्रयोगाशी जोडले गेले आहेत.
- सिद्धांताचे हिग्ज बोसॉन हे नाव ब्रिटीश शास्त्रज्ञ पीटर हिग्ज आणि भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस यांच्या नावावरून पडले आहे.
- बोस यांनी अणू क्षेत्रात महत्त्वाचे काम केले होते.
हिग्ज बोसॉन सिद्धांत १० वर्षांपूर्वी ४ जुलै २०१२ रोजी एडविन हबल नावाच्या शास्त्रज्ञाने शोधला होता. आता या गॉड पार्टिकलच्या शोधासाठी हे महायंत्र ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ पुन्हा काम करणार आहे. शास्त्रज्ञांना आशा आहे की या प्रयोगामुळे जगाची कार्यपद्धती आणि त्याच्याशी संबंधित अनेक रहस्ये उलगडतील. प्रयोगादरम्यान, मशीन प्रोटॉनवर विरुद्ध दिशेने दोन किरण उत्सर्जित करेल. हा बीम फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर पृथ्वीच्या १०० मीटर खाली असलेल्या २७ किमी लांबीच्या रिंगवर टाकला जाईल.
युरोपीयन आण्विक संस्था ‘सर्न’च्या मते, प्रोटॉन आणि प्रोटॉन यांच्यात प्रति सेकंद १.६ अब्ज टक्कर करणे हे त्याचे लक्ष्य आहे. या नवीन ऊर्जेचा दर शास्त्रज्ञांना हिग्ज बोसॉनचे अधिक बारकाईने परीक्षण करण्यास अनुमती देईल. डार्क मॅटर, डार्क एनर्जी आणि विश्वाच्या इतर मूलभूत गूढ गोष्टींचा शोध घेण्यासाठी या टक्करमधून मिळालेला डेटा भविष्यात वापरला जाईल.
बिग बँग सिद्धांताचा अभ्यास
- शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, गॉड पार्टिकलचा शोध लागला आहे ज्यापासून विश्वाचे बहुतेक भाग बनले आहे.
- हे महाकाय यंत्र बनवण्यासाठी ३१ हजार कोटींहून अधिक रुपये खर्च झाले आहेत. नवीन शोधामुळे शास्त्रज्ञांना ब्लॅक होल आणि बिग बँगचा सिद्धांत समजून घेणे सोपे होणार आहे.
बिग बँग म्हणजे काय?
बिग बँग या सिद्धांतानुसार, सुमारे १५ अब्ज वर्षांपूर्वी सर्व फिजिकल पार्टिकल आणि ऊर्जा हे सर्व एकाच बिंदूमध्ये मर्यादित होते. मग हे पसरू लागलं. यामध्ये विश्वाचे सुरुवातीचे पार्टिकल सर्वत्र पसरले आणि एकमेकांपासून दूर पसरले. या कणांपासून पृथ्वी आणि जीवनाची उत्पत्ती झाली.