Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कथाकथनातून अध्ययनः ‘कथायात्रा’ उपक्रमात सहभागी विद्यार्थी मंत्रमुग्ध!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
storytelling activities

मुक्तपीठ टीम

कथाकथनातून अध्ययनाच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने कथा यात्रा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमात सहभागी झालेले मुंबईतील शालेय विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. इंडिया टुरिझमच्या प्रादेशिक कार्यालयाने मुंबईतील कुलाबा नेव्हीनगरमधील केंद्रीय विद्यालय क्रमांक दोन या माध्यमिक शाळेच्या १५० विद्यार्थ्यांसाठी कथाकथनाचे सत्र आयोजित केले होते. त्यावेळी हा अनुभव आला.

storytelling activities

पर्यटन विभागाचा कथायात्रा उपक्रम

  • या कथा यात्रेचे उद्दिष्ट भारत सरकारचा एक भारत श्रेष्ठ भारत (ईबीएसबी) हा उपक्रम आणखी पुढे नेण्याचा आहे.
  • मुंबईतील धी(Dhi) प्रकल्पाच्या पथकाने दृक्श्राव्य माध्यम आणि नाट्यरूपांतराच्या सहाय्याने कथाकथन सत्राचे आयोजन केले.
  • आजच्या कथायात्रा सत्रामध्ये महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यांमधील संबंध मांडण्यात आले.
  • कथाकथनाची कौशल्ये अधोरेखित करून या दोन रांज्यांच्या वैभवाची माहिती देण्यात आली.
  • शालेय विद्यार्थ्यांना त्यात गुंतवून ठेवण्यात सादरकर्ते यशस्वी झाले.

storytelling activities

सत्रादरम्यान मनोरंजक गोष्टींमध्ये मग्न झालेल्या विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांतील इतिहास, संस्कृती, खाद्यपदार्थ, कला, नृत्याचे स्वरूप, स्मारक, पर्यटन आकर्षणे याबद्दल अमूल्य माहिती घेतली. या सत्रामुळे बालकांच्या कोवळ्या मनांना या दोन राज्यांबाबत शोध, परीक्षण आणि संस्कृतींशी जोडून घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. सत्राच्या अखेरीस, तिथल्या तिथेच एक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली आणि विजेत्यांना इनक्रेडिबल इंडिया मर्कंडाईज हे पुरस्कार म्हणून वितरित करण्यात आले.

कथा यात्रा उपक्रमाचा उद्देश भारतातील समान आणि वेगळी वैशिष्ट्ये असलेल्या राज्यांमधील कथा समोर आणून जागृती करणे तसेच देशाच्या युवकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करण्याचा आहे. कथा यात्रा ही भौगोलिक विविधतेनुसार देशातील कथा आणि कथाकथनाच्या विविध पद्धती समोर आणण्याची आगळी वेगळी अशी संकल्पना आहे. धी प्रकल्पाने इंडियाटुरिझम मुंबईसाठी केलेल्या कथायात्राचा उद्देश भारतातील ज्ञात आणि अज्ञात कथांद्वारे स्थानिक दंतकथा आणि आख्यायिका, स्वातंत्र्याच्या खुणा, प्रादेशिक कला आणि संस्कृती, परंपरा, पद्धती, स्थापत्य कला, क्रीडा आणि संगीत, खाद्यपदार्थ आदींचा शोध घेण्याचा आहे.


Tags: Department of Tourism storytelling activitiesgood newsmuktpeethMumbai dhi Project Squadschool studentsstorytelling activitiesstorytelling studiesकथाकथन अध्ययनकथायात्रा उपक्रमघडलं-बिघडलंचांगली बातमीपर्यटन विभाग कथायात्रा उपक्रममुक्तपीठमुंबई धी प्रकल्प पथकशालेय विद्यार्थी
Previous Post

विश्व निर्मितीच्या बिग बँग गॉड पार्टिकल शोध मोहिमेला पुन्हा सुरुवात!

Next Post

क्रीडापटूंना पुरस्कार, राष्ट्रीय कल्याण आणि निवृत्तीवेतनासाठी सरकारची सुधारित योजना

Next Post
Union Sports and Youth Affairs Minister Anurag Thakur

क्रीडापटूंना पुरस्कार, राष्ट्रीय कल्याण आणि निवृत्तीवेतनासाठी सरकारची सुधारित योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!