मुक्तपीठ टीम
बँकांच्या चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी एटीएमचा पर्याय सर्वात सोयीस्कर आहेत. मात्र कधी कधी एटीएममधून पैसे न मिळाल्यास ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ‘आऊट ऑफ सर्विस’च्या बोर्डपासून आता ग्राहकांची सुटका होणार आहे. आरबीआयने आता एटीएममधून पैसे मिळाले नाहीत तर बँकांना दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे सामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे आरबीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय १ ऑक्टोबरपासून लागू होईल.
काय आहेत आरबीआयचे निर्देश ?
- १ ऑक्टोबर २०२१ पासून हे निर्देश लागू होतील.
- जर बँकेच्या एटीएममध्ये महिन्याला १० तास पैसे उपलब्ध नसतील तर त्या बँकेला दंड होऊ शकतो.
- आरबीआयने यासंदर्भातलं एक परिपत्रक काढलं आहे.
- लोकांना एटीएमद्वारे पुरेशी रोख रक्कम मिळावी यासाठी हा निर्णय घेतला आहे.
- एटीएममध्ये पुरेशी रक्कम उपलब्ध राहील, याची खबरदारी बँकांनी घ्यावी.
- एटीएममध्ये पुन्हा पैसे न भरल्यास बँकांना दंड आकारला जाईल.
- रिझर्व्ह बँक नोटा जारी करतं. बँका त्यांच्या शाखा आणि एटीएमच्या विस्तृत नेटवर्कद्वारे लोकांना नोटांचे वितरण करून हा आदेश पूर्ण करत आहेत.
- एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे झालेल्या डाउनटाइमचा आढावा घेण्यात आला.
- आढावा घेतल्यानंतर एटीएममधल्या कॅश-आउटमुळे रोख रक्कम उपलब्ध होत नाही आणि सामान्यांची अडचण होते.
- परिणामी, बँका/ व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (डब्ल्यूएलएओ) एटीएममध्ये रोख उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि रोख रक्कम टाळण्यासाठी वेळेवर भरपाई सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या प्रणाली/ यंत्रणा मजबूत करतील असा निर्णय घेण्यात आला आहे.
- नियमांचं पालन न केल्यास याकडे गांभिर्याने पाहिलं जाईल.
- जून २०२१ च्या अखेरीस देशात वेगवेगळ्या बँकांचे २,१२,७६६ एटीएम आहेत.