Rohini Thombare

Rohini Thombare

facebook

आता फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करा आणि कमवा!

मुक्तपीठ टीम सर्वात जास्त लोकप्रिय असलेले सोशल नेटवर्किंगचे माध्यम म्हणजे फेसबुक... आता लवकरच फेसबुकवरील कन्टेन्ट वापरकर्त्यांसाठी कमाईचे साधन ठरणार आहे....

cheating

लग्नानंतर पतीजवळ जाण्यास नकार…डॉक्टरांनी तपासलं तर ‘ती’ निघाली ‘तो’!

मुक्तपीठ टीम आजकाल काय घडेल यावर विश्वासच बसत नाही... दिल्लीच्या मुजफ्फरनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पाच महिन्यांपूर्वी वधू म्हणून...

सचिन वाझेंचे व्हॉट्सअॅप स्टेटस…सतत टार्गेट केल्याची भावना!

सचिन वाझेंचे व्हॉट्सअॅप स्टेटस…सतत टार्गेट केल्याची भावना!

मुक्तपीठ टीम मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात भाजपा आक्रमक झाल्यानंतर क्राइम ब्रँचमधून त्यांची बदली करण्यात...

kishori pednekar

महापौरांचा मुंबईत आंशिक लॉकडाऊनचा इशारा

सध्या मुंबईत वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आंशिक लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. सामान्य मुंबईकरांनी कोरोना नियमांचे पालन...

health

मुरुमांपासून मळमळीपर्यंत लवंग-मध युती आहे गुणकारी

लवंग घरात असतेच असते. प्रत्येक स्वयंपाकघराच्या मसाल्याच्या डब्यात लवंग मिळतेच. सहज उपलब्ध असलेल्या लवंगचा उपयोग चवीपुरता नाही, तर आयुर्वेदिक औषध...

*मनोरंजन महत्त्वाचं*: १. आता लवकरच ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बाहुबली म्हणजेच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता सैफ अली खान यात रावणाची भूमिका साकारणार आहे. त्यांच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच अभिनेता सनी सिंह देखील चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. २. कोरोनाचे सावट लक्षात घेत सर्वत्र महाशिवरात्री उत्सव नियमांचे पालन करत साजरा करण्यात आला. तर सध्या सोशल मीडियावर या उत्सवाची एक वेगळीच चर्चा रंगली आहे. अभिनेत्री करीना कपूरचा मुलगा तैमूर एका व्हायरल फोटोमध्ये शंकराच्या गेटअपमध्ये दिसत आहे. तैमूरच्या माथ्यावर महादेवाप्रमाणेच भस्म आणि त्यावर तिसरा डोळा दिसत आहे. एवढचं नाही तर महादेवाला साजेसं असं रुप धारण करण्यासाठी त्याचे केसही बांधण्यात आले आहेत. ३. अभिनेत्री मिथिला पालकर सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या अलिबागमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय. तर मिथिलाने नुकताच एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. अलिबागमध्ये सध्या राहत असलेल्या हॉटेलमध्ये हा व्हिडीओ तिने काढला आहे. यात ती एका लोकप्रिय इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ४. “झॉलीवूड” हा चित्रपट आता लवकरच चित्रटगृहांमध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या ९ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी या नाटक विशेष प्रकारावर आधारित हा चित्रपट असणार आहे. ५. आपले लाडके बिग बी म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन हे आता पहिल्यांदाच अभिनेता इम्रान हाश्मी सोबत ‘चेहरे’ या चित्रपटात काम करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून बिग बी आणि इम्रानला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

*मनोरंजन महत्त्वाचे*: १) तरूण वर्गाचा चाहता अभिनेता वरुण धवन सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये त्याचा नवा चित्रपट ‘भेडिया’ या हॉरर कॉमेडी सिनेमाचे शूटींग करत आहे. वरुणने एका चिमुकल्या सोबतचा व्हिडीओ आणि फोटो नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. वरूण या चिमुकल्याच्या प्रेमात पडला आहे. २) सोशल मीडियावर व्हायरल झालेला अभिनेत्री जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. यामध्ये जान्हवी मुंबई विमानतळावर असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी एक चाहता जान्हवीसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या कर्मचाऱ्याने या चाहत्याच्या हातावर फटका मारत दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट जान्हवीच्या लक्षात आली तेव्हा तिने त्या चाहत्याला नाराज न करता, स्वत: चाहत्या जवळ जाऊन आणि सेल्फी काढला. ३) कोरोनाचे लसीकरण सुरू असताना अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी कोरोनाची लस घेतल्याची चर्चा आहे. तेव्हाच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक अशी ओळख असणारे सचिन पिळगावकरा यांनी नुकतेच कोरोनाची लस घेतली आहे. बीकेसी येथील जम्बो कोरोना सेंटरमध्ये लसीचा पहिला डोस घेतला आहे. ४) साऊथ अभिनेत्री समंथा अक्किनेनी आपल्या वेगवेगळ्या लूकने चाहत्यांचे मन घायाळ करत असते. हिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेतच आणि ती त्यावर नेहमी सक्रिय असते. समंथाने सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या ‘डोन्ट रश’ चॅलेंजमध्ये भाग घेत हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे ती चर्चेत आहे. ५) मराठीसृष्टीतील अभिनेत्री नेहा पेंडसे ही नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत लोकांना पाहण्यास मोह पाडते. सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू असल्याचे कारण म्हणजे तिने इंस्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे. यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. यामुळे ती चर्चेत आहे.

*मनोरंजन महत्त्वाचे* : १) “लव सुलभ” या चित्रपटाचे चित्रीकरण ठाणे येथे सुरू झाले आहे. लेखक-दिग्दर्शक-अभिनेता प्रियदर्शन जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे. २) अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच तिच्या हॉट लूकने प्रेक्षकांचे मन घायाळ करत असते. काही दिवसांपूर्वीच उर्वशीचा ‘एक लडकी भीगी भागी सी’ अल्बम रिलीज झाला आहे. यात तिचा पावसात लाल साडीवर ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय. या अल्बमला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. ३) भाजपा पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या जागतिक महिला दिनानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीस आपले नवीन गाणे घेऊन आल्या आहेत. त्यांचे हे गाणे नाट्य संगीतावर आधारित आहे. ४) हेमंत ढोमे यांनी काही दिवसांपूर्वी‘झिम्मा’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज केले होते. या सिनेमात अनेक लोकप्रिय चेहरे पाहण्यास मिळणार आहेत. एकाच सिनेमात एवढी मोठी स्टार कास्ट असल्याने सिनेमा विषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘झिम्मा’च्या टिझरवरूनच हा सिनेमा जबरदस्त असेल हे लक्षात येत आहे. ५) ‘हरफनमौला’ या गाण्यात आमिरचा रोमॅण्टिक अंदाज पाहण्यास मिळतोय. एलीसोबत आमिर या गाण्यात जबरदस्त डान्स करत आहे. आमिर खानचा ‘कोई जाने ना’ सिनेमा २६ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील ‘हरफनमौला’ या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

*मनोरंजन महत्त्वाचे*: १) ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही झी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लवकरच निरोप घेणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. या मालिकेने शेवटी काल म्हणजेच ७ मार्चला सगळ्यांचा निरोप घेतला आहे. काल या मालिकेचा शेवटचा भाग पाहण्यास मिळाला. २) अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने एक खाकी वर्दीतील फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे. ती डिजिटल पदार्पण करत असल्याचे जाहीर केले आहे. सोनाक्षी लवकरच अ‍ॅमेझॉन प्राईमवरील एका वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती एका महिला पोलिसाची भूमिका साकारत आहे. ३) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणारा नवा चित्रपट ‘राम सेतू’चे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा दिसणार आहेत. ४) ‘जॉबलेस’ या नावाची वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजच्या पटकथेत सस्पेंस क्राईम थ्रिलर पाहण्यास मिळणार आहे. ‘जॉबलेस’ची कथा ही एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसाची आहे. सध्या या सीरिजच्या शुटींगची सुरूवात झाली आहे. ५) गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता हीचे लग्न अभिनेता अक्षय वाघमारेशी झाले आहे. लॉकडाउनच्या कळात त्यांनी लग्न केले होते. त्यांच्याकडे लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अरुण गवळी आजोबा होणार आहेत. अभिनेता अक्षयने त्याच्या सोशल मीडियावर योगिताच्या डोहाळे जेवणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Vasai wada wedding break

कुंकवामुळे मोडलं लग्न! ‘या’ उच्चशिक्षित मराठी कुटुंबांमध्ये असं कसं बिघडलं?

मुक्तपीठ टीम विश्वास बसणार नाही अशी एक धक्कादायक घटना घडली आहे. व्यवसायानं डॉक्टर आणि सिव्हिल इंजिनियर असणाऱ्या दोघांचे ठरलेलं लग्न...

Page 289 of 295 1 288 289 290 295

ताज्या बातम्या

error: Content is protected !!