Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक, लेन्समधून नेले ड्रग्ज!

ड्रग्ज लपवण्यासाठी लेन्स, शिलाई, पर्सचे हँडल, अंडरवेअर, कॉलर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
aryan khan

मुक्तपीठ टीम

एनसीबीने शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर धाड टाकली होती. या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने ताब्यात घेण्यात आले होते. आता चौकशीअंती आर्यन खानला एनसीबीने अखेर अटक केली आहे. आर्यनने स्वत:च्या लेन्समधून ड्रग्ज नेलं होतं, अशी कबूली त्याने स्वत: दिली होती. एनसीबी अधिकारी आर्यनला वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात घेऊन गेले आहेत.

रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत एनसीबीने आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतले होते. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. एनसीबीने रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले. यानंतर आर्यन खानला अटक केली असून थोड्याच वेळात त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.

 

ड्रग्ज लपवण्यासाठी लेन्स, शिलाई, पर्सचे हँडल, अंडरवेअर, कॉलर!

  • एनसीबीने उघडकीस आणलेल्या क्रुझ ड्रग्ज पार्टीमध्ये सहभागी झालेल्यांकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे.
  • तपासणीतून सुटका होण्यासाठी या सर्वांनी ड्रग्ज लपवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग केला. काहींनी महिलांच्या पर्समधील
  • हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईत, पँटच्या शिलाईत, कॉलरच्या शिलाईतून अंमली पदार्थ आणले होते.
  • शाहरुखचा मुलगा आर्यनने लेन्समध्ये ड्र्ग्ज लपवून आणल्याची कबुली दिली आहे.
  • अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनीच या पार्टीबद्दल माहिती दिली होती.
  • या माहितीच्या आधारे एनसीबीने छापा टाकून २२ जणांना ताब्यात घेतले होते, आता चौकशीनंतर अटकसत्र सुरु करण्यात आले आहे.
  • कोडवर्ड वापरुन ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.
  • RTPCR असा हा कोड असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती.

 

क्रुझवर फॅशन शोचे निमित्त…

  • मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेली रेव्ह पार्टी एनसीबीने उधळली आहे.
  • या क्रूझवर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.
  • या क्रूझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती.
  • हायप्रोफाईल पार्टी असल्याने एनसीबीने शेवटपर्यंत कमालीची गुप्तता पाळत चौकशी सुरु केली होती.
  • त्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने अगोदरच बुकिंग करुन क्रूझमध्ये प्रवेश मिळवला.
  • कोणालाही संशय येऊ नये म्हणून एनसीबीचे मोजकेच अधिकारी क्रूझवर दाखल झाले होते.
  • त्यांचे सर्व सावज जाळ्यात आल्यानंतर त्यांनी कारवाई सुरु केली आणि क्रुझ मुंबईकडे वळवली.

 

हेही वाचा:

आलिशान क्रुझवर ड्रग पार्टीचा हैदोस! बॉलिवूड, ड्रग आणि धोका!

१९९७मध्ये शाहरुख म्हणाला होता, ’आर्यनने ड्रग्ज घ्यावेत!’ २०२१मध्ये ते खरे ठरले!


Tags: Aryan KhanJ.J. hospitalNCBआर्यन खानएनसीबीजे.जे. रुग्णालयरेव्ह पार्टी
Previous Post

अभिनेत्री कंगना रनौत भाजपातर्फे लोकसभा पोटनिवडणूक लढवणार?

Next Post

आईच्या इलाजासाठी मदतीचं आमिष…१२ वर्षाच्या मुलीच्या कौमार्याचा सौद्याचा कट!

Next Post
nagpur

आईच्या इलाजासाठी मदतीचं आमिष...१२ वर्षाच्या मुलीच्या कौमार्याचा सौद्याचा कट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!