मुक्तपीठ टीम
एनसीबीने शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर धाड टाकली होती. या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने ताब्यात घेण्यात आले होते. आता चौकशीअंती आर्यन खानला एनसीबीने अखेर अटक केली आहे. आर्यनने स्वत:च्या लेन्समधून ड्रग्ज नेलं होतं, अशी कबूली त्याने स्वत: दिली होती. एनसीबी अधिकारी आर्यनला वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात घेऊन गेले आहेत.
रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत एनसीबीने आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतले होते. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. एनसीबीने रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले. यानंतर आर्यन खानला अटक केली असून थोड्याच वेळात त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.
ड्रग्ज लपवण्यासाठी लेन्स, शिलाई, पर्सचे हँडल, अंडरवेअर, कॉलर!
- एनसीबीने उघडकीस आणलेल्या क्रुझ ड्रग्ज पार्टीमध्ये सहभागी झालेल्यांकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे.
- तपासणीतून सुटका होण्यासाठी या सर्वांनी ड्रग्ज लपवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग केला. काहींनी महिलांच्या पर्समधील
- हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईत, पँटच्या शिलाईत, कॉलरच्या शिलाईतून अंमली पदार्थ आणले होते.
- शाहरुखचा मुलगा आर्यनने लेन्समध्ये ड्र्ग्ज लपवून आणल्याची कबुली दिली आहे.
- अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनीच या पार्टीबद्दल माहिती दिली होती.
- या माहितीच्या आधारे एनसीबीने छापा टाकून २२ जणांना ताब्यात घेतले होते, आता चौकशीनंतर अटकसत्र सुरु करण्यात आले आहे.
- कोडवर्ड वापरुन ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.
- RTPCR असा हा कोड असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती.
क्रुझवर फॅशन शोचे निमित्त…
- मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेली रेव्ह पार्टी एनसीबीने उधळली आहे.
- या क्रूझवर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.
- या क्रूझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती.
- हायप्रोफाईल पार्टी असल्याने एनसीबीने शेवटपर्यंत कमालीची गुप्तता पाळत चौकशी सुरु केली होती.
- त्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने अगोदरच बुकिंग करुन क्रूझमध्ये प्रवेश मिळवला.
- कोणालाही संशय येऊ नये म्हणून एनसीबीचे मोजकेच अधिकारी क्रूझवर दाखल झाले होते.
- त्यांचे सर्व सावज जाळ्यात आल्यानंतर त्यांनी कारवाई सुरु केली आणि क्रुझ मुंबईकडे वळवली.
हेही वाचा:
आलिशान क्रुझवर ड्रग पार्टीचा हैदोस! बॉलिवूड, ड्रग आणि धोका!
१९९७मध्ये शाहरुख म्हणाला होता, ’आर्यनने ड्रग्ज घ्यावेत!’ २०२१मध्ये ते खरे ठरले!