मुक्तपीठ टीम
वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होतात. वाहतुकीचे इंधन, घरगुती इंधनाचे अकार्यक्षम ज्वलन, कोळशावर चालणारे वीज प्रकल्प, शेती आणि कचरा जाळणे यामुळे निर्माण होणऱ्या वायूमुळे श्वसनाचे संक्रमण, हृदयविकार आणि कर्करोग अशा अनेक रोगांना वायु प्रदूषणापासून धोका आहे. आजारी असलेल्या लोकांवर अधिक गंभीर परिणाम होतात. वायू प्रदूषणामुळे उच्च रक्तदाब आणि किडनीच्या आजाराने ग्रस्त लोकांच्या हृदयालाही हानी पोहोचते.
एका संशोधनातून समोर आलेली माहिती नुसार हवेच्या खराब गुणवत्तेमुळे हृदयविकार होण्याचा धोका आहे, तर
किडनीच्या रुग्णांसाठी हा धोका अधिकच वााढत आहे. गंभीर किडनी रोग (CKD) सह उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांमध्ये ग्लाइसिन -३ पातळी वाढते. हे हृदयात डाग पडण्याचे लक्षण आहेत. दोन वर्षांत, संशोधकांनी वय, लिंग आणि बॉडी मास्क इंडेक्स (बीएमआय) सारख्या घटकांचा विचार केला आणि वायु प्रदूषणामुळे रुग्णांच्या आरोग्यामध्ये झालेल्या बदलांच्या संदर्भात निष्कर्ष काढला. अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी (ASN) किडनी वीक-२०२१किडनी वीक-२०२१ मध्ये अभ्यासाचे निकाल ऑनलाइन जाहीर झाले.
यूएसमधील केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीच्या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका हफसा तारिक यांनी स्पष्ट केले की, “वायू प्रदूषण कमी केल्याने सीकेडी ग्रस्तांना फायदा होईल, कारण त्यांना हृदयविकाराचा धोका कमी होईल, सीकेडी असलेल्या लोकांमध्ये वायु प्रदूषण थेट मायोकार्डियल फायब्रोसिसशी संबंधित आहे.” मायोकार्डियल फायब्रोसिस हृदयात फायब्रोब्लास्ट्स नावाच्या पेशी कोलेजेनस स्कार टिश्यू तयार करू लागतात. यामुळे हृदयक्रिया बंद पडण्याबरोबरच मृत्यूचीही शक्यता असते.