Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवाब मलिकांचे आरोप वापरत आघाडीला घेरण्याचा मोहित कंबोज यांचा प्रयत्न

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nawab malik mohit

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे सध्या चर्चेत आहेत. एनसीबी ड्रग्स प्रकरणी आघाडीला अडचणीत आणू पाहणाऱ्या भाजपा नेत्यांवर, एनसीबी अधिकाऱ्यांना ते उघडे पाडत आहेत. मात्र, त्यांनी रविवारी केलेल्या गौप्यस्फोटांमधील माहिती वापरत आघाडीलाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपा नेते मोहित कंबोज उर्फ भारतीय यांनी केला आहे.

 

ड्रग्स प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले फॅशन टीव्हीचे काशिफ खान कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना वारंवार क्रुझ पार्टीला बोलवून टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मलिक यांनी केला. त्याचा संदर्भ देत कॅबिनेट मंत्री अस्लम शेख आणि काशिफ खानचे काय संबंध आहेत हे लोकांसमोर उघडकीस आले पाहिजेत, असे कंबोज म्हणाले. तसेच, अस्लम शेख यांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

भाजप नेते मोहित कंबोज यांचे थेट आरोप

  • अस्लम शेख आणि काशिफ खानचे संबंध होते हा माझा आरोप नाही. नवाब मलिक यांचा आहे.
  • मी फक्त कोणता मंत्री यात सामील आहे असा प्रश्न विचारला होता? मी कुणाचंही नाव घेतलं नाही. मलिक यांनीच नाव घेतले, असे कंबोज म्हणाले.

 

कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना काशिफ खानकडून वारंवार पार्टीचे आमंत्रण कसे?

  • ओळख नसलेला माणूस एकदा अमंत्रित करेल, परंतु ओळख नसेल तर वारंवार कसे बोलावेल?
  • एका कॅबिनेट मिनिस्टरला अनोळखी माणूस वारंवार फोर्स कसा करू शकतो?
  • अस्लम शेख यांचे कॉल रेकॉर्ड चेक केले पाहिजे. नवाब मलिकांनी अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.
  • अस्लम शेखचाही काशिफ सोबत संबंध होते त्यांचेही कॉल रेकॉर्ड चेक झाले पाहिजे असे नवाब मलिक म्हणाले.
  • नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हे नवे गौप्यस्फोट केले आहेत. या गौप्यस्फोटानंतर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे.

 

राजकारण्यांच्या मुलांशी काशिफचे संबंध कसे?- मोहित कंबोज

  • अनेक बड्या नेत्यांच्या मुलांना काशिफ खानने पार्टीत येण्याचे आमंत्रण दिले होते.
  • काशिफ खानचे आणि या नेत्यांच्या मुलांचे काय संबंध आहेत? या मुलांसोबत काशिफची कुठे बैठक झाली का? याचीही चौकशी झाली पाहिजे.
  • मलिक यांनी ही माहिती उघड केल्यामुळे आता लवकरच सर्व प्रकरण बाहेर येईल, असंही ते म्हणाले.
  • राजकारणी आणि सेलिब्रिटींच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरशी काय संबंध आहेत याची माहिती मलिक यांना द्यावी लागेल. कारण मलिक यांची ही जबाबदारी आहे.

Tags: Aryan Khan Cruise Caseaslam shaikhkashif khanMohit kambojmuktpeethnawab mailkNCBNCPअस्लम शेखकाशिफ खानक्रूज ड्रग्स प्रकरणनवाब मलिकमहाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिकमोहित कंबोज
Previous Post

नवाब मलिकांचा धक्कादायक आरोप, आर्यन खान क्रुझवर नव्हताच, त्याचे अपहरण केले गेले!

Next Post

वायू प्रदूषणानं काय फरक पडतो? वाचा कसं किडनी रोगी आणि ह्रदयविकारग्रस्तांचा धोका वाढतो…

Next Post
air pollution

वायू प्रदूषणानं काय फरक पडतो? वाचा कसं किडनी रोगी आणि ह्रदयविकारग्रस्तांचा धोका वाढतो...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!