Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

५०,००० चे लाभ कोरोना विधवांना नीट मिळेनात, निराधार पेन्शन, बालसंगोपनापासूनही वंचित!

कोरोना एकल पुनर्वसन समितीच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

February 25, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
widow in corona

मुक्तपीठ टीम

कोरोनात विधवा झालेल्या महिलांना सर्वोच्च न्यायालयाने ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली.  तरीसुद्धा कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने केलेल्या सर्वेक्षणात फॉर्म भरलेल्या १६०० महिलांपैकी फक्त ५५२ महिलांनाच(३० टक्के ) अद्याप पैसे मिळाल्याचे दिसून येते तर उरलेल्या महिलांपैकी  ३०७ फार्म पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत असे उत्तर आले तर  ५९९ महिलांना आपल्या फॉर्मचे पुढे काय झाले ?याबाबत काहीच सांगता आले नाही.१३० फॉर्ममध्ये त्रुटी आहेत तर  ४८महिलांचे फार्म नाकारण्यात आले आहेत. याचा अर्थ ही प्रक्रिया अतिशय संथ असून महिलांना त्यांच्या फॉर्मबद्दल पुढील काहीच कार्यवाही बाबत कळवले जात नाही व महिला त्याबाबत काही सांगू शकत नाही असे लक्षात येते आहे. तर इतरांची प्रक्रिया अजून सुरू आहे किंवा त्यांना त्याबाबत काहीच कळवले गेलेले नाही किंवा अपूर्णता असल्याचे महिलांनी सांगितले.

 

३१जिल्ह्यातील १८५८ कुटुंबांचे सर्वेक्षण कोरोना एकल पुनर्वसन समितीच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यानी केले.दीपाली सुधींद्र यांनी या सर्वेक्षणाचे विश्लेषण केले.

 

संजय गांधी निराधार योजना ही एकमेव निराधार पेन्शन महिलांना मिळू शकते. त्यातही पात्र असूनही१६२९ पैकी  ७०२ महिलांना( ४३% )महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही असे महिलांनी सांगितले तर शासनाने गाजावाजा करून पुढे आणलेल्या बाल संगोपन योजनेत पात्र असूनही  ८३९ (४८टक्के)महिलांना लाभ मिळू शकलेला नाही इतके हे गंभीर आहे.. या दोन योजनांचा लाभ जर सर्व पात्र महिलांना मिळाला तर त्या महिलांना जगण्यासाठी नक्कीच आधार मिळू शकतो परंतु महिला बालकल्याण विभाग व महसूल विभाग या बाबत आणि वेगाने काम करत नाही असे दिसून येते

 

या १८५८ पैकी ९०० महिला कर्जबाजारी असल्याचे दिसून आले ५०% महिलांवर कर्ज आहे त्यापैकी ५० टक्के महिलांवर १ लाखापेक्षा कमी कर्ज तर  ३२ टक्के महिलांवर ५ लाखापेक्षा कमी कर्ज आहे तर १३ टक्के महिलांवर पाच लाखापेक्षा जास्त कर्ज आहे. कर्ज असलेल्या महिलांपैकी फक्त ३३टक्के महिलांनी राष्ट्रीय किंवा खाजगी बँकांकडून कर्ज घेतले असून इतर कर्ज हे पतसंस्था नातेवाईक किंवा खाजगी सावकार मायक्रोफायनान्स कडून घेतलेले आहे.मायक्रोफायनान्स व खाजगी सावकार हे अधिक धोकादायक आहे ..या महिलांपैकी बहुतेक महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय करण्याची तयारी दाखवली त्यात दुकान टाकणे(३०%) लघु उद्योग (२९%) शेतीपूरक व्यवसाय(१९%)शिवणकाम(२०टक्के) करण्यासाठी त्या महिला तयार आहेत पण त्यातील ७५ टक्के महिलांना कर्ज आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

दुर्दैवाने व्यक्तिगत स्तरावर कर्जाच्या योजना अतिशय कमी असल्याने त्यात  बँकेच्या अनेक अडचणी त्यांना येत आहेत.
तेव्हा या महिलांसाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात व्यक्तिगत कर्जाची योजना बनवण्याची गरज आहे. असे कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.

 

विनातारण बिनव्याजी कर्ज या महिलांना देणे आवश्यक आहे तरच त्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील व त्याचवेळी बाल संगोपन योजना व  संजय गांधी निराधार योजना याबाबत प्रत्येक पात्र महिलेला लाभ मिळतो का ? याविषयी महिला बालकल्याण विभाग व महसूल विभाग यांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.


Tags: coronaMaharashtrawidowswomensकोरोना एकल  पुनर्वसन समिती
Previous Post

देशाचा राष्ट्रीय शेअर बाजार चालवणारा ‘बाबा’ जेरबंद? बाबा बोले, सीईओ हले!!

Next Post

माजी अर्थ मंत्री, सुधीर मुनगंटीवार यांची पत्रकार परिषद

Next Post
माजी अर्थ मंत्री, सुधीर मुनगंटीवार यांची पत्रकार परिषद

माजी अर्थ मंत्री, सुधीर मुनगंटीवार यांची पत्रकार परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!