Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशाचा राष्ट्रीय शेअर बाजार चालवणारा ‘बाबा’ जेरबंद? बाबा बोले, सीईओ हले!!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
anand Subramanyam

मुक्तपीठ टीम

‘एनएसई’ को-लोकेशन प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात सीबीआयने आनंद सुब्रमण्यम यांना चेन्नई येथून अटक केली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ही माहिती दिली. सीबीआयने त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानावर छापा टाकला होता. आनंद हेच एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या निर्णयांची सूत्रं हलवणारे रहस्यमय बाबा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हिमालयातील एका अज्ञात योगी बाबाच्या सांगण्याप्रमाणे चित्रा रामकृष्ण देशाच्या राष्ट्रीय शेअर बाजार चालवत असत, असा आरोप आहे. आनंद आणि त्यांच्या पत्नीला फारसा अनुभव नसताना कोट्यवधीच्या पॅकेजवर एनएसईच्या सेवेत घेतल्यापासून कुजुबुज सुरु झाली होती. सीबीआयने आनंद सुब्रम्हण्यम यांची तीन दिवस चौकशी केली आहे, लवकरच तोच बाबा आहे की आणखी इतर कुणी ते स्पष्ट होईल.

 

बाजार नियामक सेबीच्या म्हणण्यानुसार, आनंदची पत्नी सुनीता १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ दरम्यान स्टॉक एक्सचेंजच्या चेन्नई कार्यालयात सल्लागार म्हणून रुजू झाली होती. त्यावेळी त्यांचा पगार ६० लाख रुपये ठरला होता. त्याच दिवशी आनंद यांची मुख्य धोरणात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांचा पगार १.६८ कोटी रुपये होता.

 

एनएसई को-लोकेशन घोटाळ्याच्या संदर्भात ही अटक करण्यात आल्याचे सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले. एनएसईमध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या या घोटाळ्यातील ही आतापर्यंतची पहिली अटक आहे. गुरुवारी रात्री आनंद सुब्रमण्यम यांना त्यांच्या चेन्नईतील घरातून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात नेण्याची तयारी सुरू असून, त्यानंतर त्यांना कोठडीसाठी न्यायालयात हजर केले जाईल.

 

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, याचिका मंजूर झाल्यानंतर, सीबीआय त्यांना राष्ट्रीय राजधानीत आणेल आणि त्याच्या मुख्यालयातील विशेष न्यायालयात हजर करेल आणि या प्रकरणाशी संबंधित चौकशीसाठी त्यांना कोठडीत रिमांडवर घेऊन जाईल.

 

‘एनएसई’ को-लोकेशन प्रकरण काय?

  • ‘एनएसई’कडून सह-स्थान (को-लोकेशन) सुविधेअंतर्गत, त्यांच्या दलाल सदस्यांना संगणकीय सव्‍‌र्हर हे बाजाराच्या डेटा सेंटरमध्ये ठेवण्याची सवलत आहे.
  • या सुविधेमुळे या दलाल सदस्यांकडून होणाऱ्या नोंद व्यवहारांना जलद अॅक्सेस मिळतो तसेच, त्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची अंमलबजावणी शीघ्रगतीने होण्यास मदत होते.
  • या सुविधेसाठी एनएसई सदस्यांकडून अतिरिक्त शुल्कही वसूल केले जाते.
  • मात्र जुलै २०१६मध्ये त्रयस्थ संस्थेकडून केल्या गेलेल्या न्यायवैद्यक तपासणीत या सुविधेत काहीतरी संशयास्पद असल्याचे ‘सेबी’च्या ध्यानात आले.
  • यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे पुढे तपासात आढळून आले.

 

रामकृष्ण यांना ३ कोटींचा दंड

  • या प्रकरणी सेबीने रामकृष्ण यांना ३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
  • याशिवाय सेबीने एनएसईला २ कोटी रुपये, एनएसईचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ रवी नारायण यांना २ कोटी रुपये आणि मुख्य नियामक अधिकारी आणि अनुपालन अधिकारी व्ही आर नरसिंहन यांना ६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Tags: Anand SubramaniamCBINSESEBIआनंद सुब्रमण्यमएनएसईसीबीआयसेबी
Previous Post

‘माविम’ म्हणजे महिलांसाठी ‘विकासाचा महामार्ग’ – महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर

Next Post

५०,००० चे लाभ कोरोना विधवांना नीट मिळेनात, निराधार पेन्शन, बालसंगोपनापासूनही वंचित!

Next Post
widow in corona

५०,००० चे लाभ कोरोना विधवांना नीट मिळेनात, निराधार पेन्शन, बालसंगोपनापासूनही वंचित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!