मुक्तपीठ टीम
कल्याण येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ७० वर्षीय वृद्ध महिलेवर यशस्वीरित्या पहिली अनसिमेण्टेड रिव्हर्स टोटल शोल्डर रिप्लेसमेंट सर्जरी केली. रूग्ण विस्थापित खांद्याने पीडित होती, ज्यासाठी तिने स्थानिक बोनसेटरकडून उपचार घेतले होते. पण योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिच्या खांद्याची स्थिती मागील ६ महिन्यांमध्ये अत्यंत बिकट झाली. कल्याण येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील जॉइण्ट रिप्लेसमेंटचे सल्लागार आणि स्पाइन सर्जन डॉ. राघवेंद्र केएस यांच्या नेतृत्वांतर्गत तज्ञांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली आहे आणि तिला वेदना व तणावामधून बरे केले आहे.
”मी निवृत्त सेना अधिकारी आहे. मी ड्युटीवर असताना माझ्या आईचा खांदा अनेक वेळा विस्थापित झाला होता. याबाबत काहीच माहित नसल्यामुळे माझ्या आईने तिच्या खांद्याच्या उपचारासाठी स्थानिक बोनसेटरला भेट दिली. यामुळे तिला काही काळासाठी बरे वाटले, पण खांदा विस्थापित होणे वारंवार होऊ लागले. गेल्या वर्षी मी निवृत्त झालो आणि लॉकडाऊन होण्यापूर्वी घरी परतलो तेव्हा मला दिसण्यात आले की माझ्या आईचा खांदा योग्य स्थितीत नाही. काही महिन्यांनंतर तिला वेदना जाणवू लागल्या आणि आम्हाला समजले की ती दीर्घकाळापासून मोडलेल्या खांद्यासह राहत होती. हॉस्पिटल्समधील सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर मी ऑर्थोपेडिक डॉक्टरांशी सल्लामसलत केली, ज्यांनी सर्जरी करण्याचा सल्ला दिला. मला फोर्टिस हॉस्पिटलचा संदर्भ देण्यात आला. माझा भाऊ व मला वाटले की, आम्ही आमच्या आईला येथे आणून योग्य निर्णय घेतला आहे. पण हा उपचार मिळण्यामध्ये विलंब झाल्याने तिला दीर्घकाळापर्यंत वेदनांचा त्रास सहन करावा लागला. या शस्त्रक्रियेमुळे ती आता काहीशी निश्चिंत झाली आहे,” असे रूग्णाचा मुलगा संतोष महाडिक म्हणाला.
रूग्णाला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले तेव्हा तिला ६ महिन्यांहून अधिक काळापासून वेदना व त्रास होत होता. ती दुर्लक्षित करण्यात आलेल्या राइट अॅण्टेरिअर शोल्डर डिस्लोकेशनने पीडित होती आणि तिच्या खांद्याची हालचाल ९० टक्क्यांहून अधिक थांबली होती. एमआरआय केल्यानंतर अॅण्टेरिअर डिस्लोकेटेड शोल्डरसह बँकार्टस् लेसन, जवळपास २० मिमी हिलसॅच लेसन, संपूर्ण रोटेटर कफ टीअर, ग्लेनो-ह्युमरल आर्थिरिटीस आणि जॉइण्ट एफ्यूजन असल्याचे निदान झाले. संपूर्ण फिटनेसचे मूल्यांकन केल्यानंतर रूग्णावर सर्जरी करण्यात आली.
डॉ. राघवेंद्र केएस म्हणाले, ”रिव्हर्स शोल्डर आर्थोप्लास्टी हा शोल्डर रिप्लेसमेंटचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये ग्लेनो-ह्यूमरलच्या नॉर्मल बॉल व सॉकेटची स्थिती उलट केली जाते, ज्यामधून फिक्स आधारासह अधिक स्थिर सांध्याची निर्मिती केली जाते. ही जटिल शस्त्रक्रिया आहे आणि पारंपारिक शस्त्रक्रिया इच्छित वैद्यकीय परिणाम देत नसल्यास केली जाते. या रूग्णाच्या केसमध्ये दुर्लक्षपणा आणि योग्य उपचाराचा अभाव या कारणामुळे तिच्यावर ही स्थिती ओढावली. स्थानिक बोनसेटर्सवर विश्वास ठेवण्यापेक्षा वैद्यकीय तज्ञाकडून योग्य निदान व तपासणी करणे आवश्यक आहे. अशा दुर्लक्षपणामुळे वेदना व त्रासाच्या रूपात रूग्णांना मोजावी लागणारी किंमत मोठी असू शकते.”