Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“वन्यजीवांचे संरक्षण करून पर्यावरणाचा समतोल राखा”

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आवाहन

March 3, 2021
in सरकारी बातम्या
0
ajit

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात जैव विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही जैव विविधता टिकविण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करावेत, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, वन्यजीवांचे संरक्षण करून सर्वांनी पर्यावरणाचा समतोल राखावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करुन राज्यातील जनतेला ‘जागतिक वन्यजीव दिना’च्या शुभेच्छा दिल्या.

जागतिक वन्यजीव दिनाचे औचित्य साधून, ‘बायो स्फिअर’ आणि ‘व्हाईस ऑफ द वाईल्ड’ संस्थेच्या भोरड्या (पळस मैना) या पक्षावरील शॉर्ट फिल्मचे (लघुपट) प्रदर्शन तसेच पर्यावरणासाठी दृक-श्राव्य माध्यमातून योगदान देणाऱ्या ‘वन्यजीवांचा आवाज’ या संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज मंत्रालयातील समिती सभागृहात करण्यात आले.

Ajit pawar

यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, बायो स्फिअर, व्हाईस ऑफ द वल्ड संस्थेचे डॉ. सचिन पुणेकर, सुधीर सावंत, निविदिता जोशी, मंदार नागरगोजे, शाहू सावंत उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओढा आहे. आपले ऐतिहासिक, कृषी, निसर्ग, धार्मिक पर्यटन समृद्ध आहे. पक्षांना पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं ग्रामीण भागाकडे येत आहेत. ‘बायो स्पेअर’ संस्थेची भोरड्या (पळस मैना) पक्षांवरची शॉर्ट फिल्म पाहून पक्षी पर्यटनाकडे लोकांचा ओघ वाढेल. भोरड्या हा पक्षी निसर्गाचा मित्र आहे. हे पक्षी केवळ मनोरंजन करत नाहीत, तर गवतांच्या बियांबरोबरच लाखोंच्या संख्येने किटक खातात. त्यामुळे शेतकऱ्यांची पीके सुरक्षीत राहतात. अशा या निसर्ग मित्र पक्षाचे आपण संरक्षण केले पाहिजे. निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. महाराष्ट्रात पर्यटकांमध्ये ‘पक्षी पर्यटना’ विषयी आवड निर्माण होईल”, असा विश्वासही उपमुख्यंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Ajit pawar

यावेळी अजानवृक्षाला जलार्पण, भोरड्या पक्षावरील लघुपटाचे प्रदर्शन, वन्यजीवांचा आवाज संस्थेचे उद्घाटन, संस्थेच्या लोगोचे अनावरण, भोरड्या पक्षाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

 


Tags: Deputy Chief Minister Ajit Pawarउपमुख्यमंत्री अजित पवारजागतिक वन्यजीव दिनपर्यावरण संवर्धनमंत्रालयवन्यजीवांचा आवाज
Previous Post

#व्हाअभिव्यक्त! सर्व प्रकारच्या आंदोलनांची हत्यारे मोडीत काढली आहेत का..?

Next Post

वयाच्या ७० वर्षी महिलेचा खांदाच बदलला…शोल्डर रिस्पलेसमेंट सर्जरीचा यशस्वी लढा!

Next Post
women

वयाच्या ७० वर्षी महिलेचा खांदाच बदलला...शोल्डर रिस्पलेसमेंट सर्जरीचा यशस्वी लढा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!