रोहिणी ठोंबरे / मुक्तपीठ टीम
रेल्वेने प्रवास करत असलेल्यांसाठी एक उपयोगी बातमी आहे. भारतीय रेल्वेचे काही खास नियम आहेत, ज्यांची माहिती खूप महत्त्वाची आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या ८० टक्के प्रवाशांना हे नियम माहीत नाहीत. प्रवासादरम्यान सामान चोरीला गेले तर, त्याची भरपाईही मिळू शकते. चोरी झालेल्या सामानाच्या भरपाईसाठी दावा करता येतो. एवढेच नाही तर ६ महिन्यांत तुम्हाला सामान मिळाले नाही तर, ग्राहक मंचाकडेही जाऊ शकता. असे बरेच नियम आहेत ज्याबद्दल जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.
आवश्यक जानकारी :~
————————
अगर ट्रेन मे सफर के दौरान आपका सामान गुम/ चोरी हो जाये तो सुप्रीम कोर्ट के एक आदेश के अनुसार आप रेलवे पुलिस थाने मे FIR फॉर्म भर कर शिकायत दर्ज करा सकते है। इसके बाद भी अगर सुनवाई नही होती या सामान नही मिलता तो रेलवे आपको मुआवजा देने के लिए बाध्य होगा।— NCIB Headquarters (@NCIBHQ) November 25, 2022
सर्वोच्च न्यायालयाचे नियम काय सांगतात?
- सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार, ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान सामान चोरीला गेले तर, आरपीएफ स्टेशनवर जाऊन तक्रार नोंदवता येते.
- त्यासोबतच एक फॉर्म देखील भरा.
- ६ महिने माल न मिळाल्यास ग्राहक मंचात तक्रार करावी, असे त्यात लिहिले आहे.
- एवढेच नाही तर मालाची किंमत मोजल्यानंतर रेल्वे त्याची भरपाई देते. त्यामुळे नुकसान भरून निघेल.
वेटिंग तिकिटावर प्रवास करता येत नाही!
- जर वेटिंग तिकीट असेल तर ट्रेनच्या आरक्षित डब्यातून प्रवास करू शकत नाही.
- प्रवास करताना पकडले गेल्यास किमान २५० रुपये दंड भरावा लागेल आणि त्यानंतर पुढील स्थानकावरून जनरल डब्यातून प्रवास करावा लागेल.
- चारपैकी दोन प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झाले, तर टीटीईची परवानगी घेतल्यानंतर उर्वरित दोन जण त्यांच्या सीटवर जाऊ शकतात.
दंड केव्हा आणि कोणत्या वेळी आकारला जातो?
- प्रवासादरम्यान तिकीट नसेल तर रेल्वे कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत कठोर कारवाई केली जाऊ शकते.
- या कलमांतर्गत, प्रवासाच्या अंतरासाठी रेल्वेकडून निश्चित सामान्य भाडे आकारले जाऊ शकते किंवा ज्या स्थानकावरून ट्रेन सुटली त्या स्थानकापासून निश्चित अंतरासाठी निश्चित सामान्य भाडे आकारले जाऊ शकते आणि २५० रुपये दंड देखील आकारला जाऊ शकतो.
- जर लोअर क्लासचे तिकीट असेल तर भाड्यातील फरक देखील आकारला जाईल.
- याशिवाय तिकिटात छेडछाड करून प्रवास करताना प्रवासी पकडले गेल्यास रेल्वेच्या कलम १३७ नुसार गुन्हा दाखल केला जाईल.
- या प्रकरणात प्रवाशाला ६ महिन्यांची शिक्षा आणि १ हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.