मुक्तपीठ टीम
गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपकडून NDTV विकत घेण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली जात आहेत. अदानी समूहाने NDTV मधील २६% सार्वजनिक भागभांडवल खरेदी करण्यासाठी प्रस्तावित खुल्या ऑफरसाठी नवीन तारीख निश्चित केली आहे. NDTV साठी अदानीची ओपन ऑफर आता २२ नोव्हेंबरला सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि ५ डिसेंबरला बंद होईल. यापूर्वी १७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत खुली ऑफर सुरू ठेवण्याचा प्रस्ताव होता.
खुल्या ऑफरचा अर्थ काय ?
- हे कंपनी मिळवण्याचा हा एक पारदर्शक आणि कायदेशीर मार्ग मानला जातो.
- या अंतर्गत, अधिग्रहण करणारी कंपनी आपल्या डीलमध्ये ज्या कंपनीची खरेदी करायची आहे त्याच्या भागधारकांना सामील करते.
- खुली ऑफर ही विक्री करणार्या कंपनीच्या स्थिर भागधारकांना निश्चित किंमतीला समभाग विकण्याची ऑफर असते.
- याद्वारे अधिग्रहण करणाऱ्या कंपनीला आपले वर्चस्व वाढवायचे आहे.
- एनडीटीव्हीच्या बाबतीत, अदानी समूहालाही आपला हिस्सा ५० टक्क्यांपेक्षा जास्त ठेवायचा आहे.
- त्यामुळेच खुल्या ऑफरचा मार्ग निवडण्यात आला आहे.
२९.१८ टक्के थेट भागीदारी:
- गौतम अदानी यांच्या समूहाने ऑगस्टमध्ये विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VCPL) विकत घेतले.
- VCPL ने एक दशकापूर्वी एनडीटीव्हीच्या संस्थापकांना वॉरंटच्या विरोधात ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज दिले होते.
- कर्ज न भरल्यास NDTV च्या संस्थापकांनी कंपनीला मीडिया समूहातील २९.१८ टक्के भागभांडवल विकत घेण्याची परवानगी दिली.
- VCPL सोबत AMG मीडिया नेटवर्क्स आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने २९४ रुपये प्रति शेअर या ऑफर किंमतीवर अतिरिक्त २६ टक्के स्टेक किंवा १.६७ कोटी इक्विटी शेअर्स विकत घेण्याची ऑफर दिली आहे.
- एनडीटीव्हीच्या प्रवर्तकांनी खुल्या ऑफर आणि व्हीसीपीएल स्टेक घेण्यास विरोध केला होता.
- सेबी आणि आयकर विभागाच्या मान्यतेशिवाय हा करार पुढे जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद होता.
- त्याच वेळी, अदानी समूहाने हा दावा फेटाळून लावला होता की भागविक्रीसाठी कर अधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक आहे.
- NDTV च्या प्रवर्तकांनी दावा केला की ते संपादनाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते आणि ते त्यांच्या संमतीशिवाय केले गेले.