Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते पुढारी हेल्थ आयकॉन पुरस्काराचे वितरण

November 12, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
pudhari Health Icon Award

मुक्तपीठ टीम

प्रधानमंत्री आयुष्मान योजना, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना या सारख्या आरोग्य योजनांचा वंचित, गरीब, असाह्य घटकातील रुग्णांना लाभ देण्याचे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  डॉक्टरांना केले.

पुढारी माध्यम समूहाच्यावतीने हॉटेल हयात येथे आयोजित ‘पुढारी हेल्थ आयकॉन पुरस्कार’ वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मविभूषण डॉ.कांतीलाल संचेती, मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, अध्यक्ष तथा समूह संपादक योगेश जाधव, समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, पुणे आवृत्तीचे संपादक सुनील माळी आदी उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, कोरोना काळात देशात डॉक्टर, परिचारिका, पोलीस, प्रशासन यांच्यासह समाजातील सर्व घटकामध्ये राष्ट्रभावना निर्माण होवून एकजुटीने आपआपल्या पद्धतीने सेवा करीत होते. डॉक्टरांचे कार्य पवित्र आहे. लोक डॉक्टरांकडे देव म्हणून जातात. प्रत्येक डॉक्टर आपल्या क्षेत्रात तज्ज्ञ असतो. ते रुग्ण बरे होण्यासाठी उत्तम उपचार करतात.

रुग्णसेवेतून डॉक्टरांना आनंद मिळतो. स्वतःचे आर्थिक हित आणि उपचार यामध्ये संतुलन राखत डॉक्टर  रुग्णसेवा करतात. डॉक्टरांनी गरीब लोकांना आपल्या दवाखान्यात स्वस्त, परवडणारे उपचार करावे. त्यासाठी असलेल्या आरोग्य विषयक योजनांचे लाभ देवून त्यांचे जीवनमान सुकर करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

पुढारी वृत्तपत्राची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळात झाल्याचा उल्लेख करुन त्यांनी वृत्तपत्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पद्मविभूषण डॉ. संचेती म्हणाले, जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम पुढारीच्या माध्यमातून होत आहे, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. डॉक्टर देवदूत म्हणून कार्य करतात. रुग्णांची सेवा मनोभावाने करतात. त्यामुळे अनेक रुग्ण बरे होतात, असेही ते म्हणाले.

पद्मश्री श्री. जाधव  म्हणाले, स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत पुढारी समूह विविध क्षेत्रात आपले योगदान देत आलेले आहे. सियाचीनच्या रणभूमीवर उभारण्यात आलेले रुग्णालय जवानांसाठी संजीवनी ठरत आहे. या रुग्णालयामध्ये दरवर्षी अत्याधुनिक साधनांची भर पडत आहे. गुजरात राज्यातील भूकंपग्रस्त भुज भागात रुग्णालय उभारण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात विविध उपक्रम राबविण्यात आले. दिव्यांग नागरिकांसाठी राज्यव्यापी लसीकरण मोहीम घेण्यात आली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान डॉक्टरांचा सन्मान करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

राज्यपाल यांच्या हस्ते पद्मविभूषण डॉ. कांतीलाल संचेती यांचा विशेष सन्मान करण्यात करण्यात आला. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील डॉक्टरांचा सन्मानही करण्यात आला.


Tags: governor bhagat singh koshyariPudhariPudhari Health Icon Awardपुढारीपुढारी हेल्थ आयकॉन पुरस्कारराज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Previous Post

आयपीएलमध्ये ताण नसतो, मग भारतासाठी खेळतानाच वर्कलोड कसा? – सुनिल गावस्कर

Next Post

NDTV खरेदी करण्याच्या दिशेने अदानींचं पुढचं पाऊल! जाणून घ्या नवं काही…

Next Post
Gautam Adani

NDTV खरेदी करण्याच्या दिशेने अदानींचं पुढचं पाऊल! जाणून घ्या नवं काही...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!