मुक्तपीठ टीम
भारत – पाकिस्तान यांच्यामध्ये जरी शस्त्रसंधीच उल्लघंन झालेली असली तरी त्याचा पाकिस्तान गैरफायदा घेऊ शकेल, यामुळेच भारताकडूनही या संबंधात पाकिस्तानला तसे काही होत असेल तर दहशतवादी हल्ले व घुसखोरी या अनुषंगाने शस्त्रसंधी धुडकावली जाईल. यापूर्वी २००३ मध्येही शस्त्रसंधी झालेली होती, मात्र त्यानंतर पाकिस्तानकडून अनेकदा आगळीक झाली. पाकिस्तानला आता या नव्या शस्त्रसंधी करारामुळे सुधारण्याची संधीच भारताने दिलेली आहे, असे मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी रविवारी ऑनलाईन व्याख्यानात बोलताना व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने रविवारी २८ फेब्रुवारी २०२१ ला आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी तीन प्रमुख विषयांना त्यांनी विशद केले. त्यात भारत – पाकिस्तान शस्त्रसंधी, एफएटीएफ आणि चीन संबंधातील ब्रह्मपुत्रा नदीवरील धरण, ब्रिक्स बैठकीच्या निमित्ताने असलेल्या वृत्तांची सत्यासत्यता यावर त्यांनी विश्लेषण केले.
शस्त्रसंधी संबंधात त्यांनी सांगितले की, “दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी शस्त्रसंधीचा हा निर्णय घेतल्याने वारंवार होणाऱ्या एलओसीवरील विविध प्रकारच्या नुकसानाच्या घटना आणि कृती यांना आळा बसेल. त्यामुळे सैनिकांचे पडणारे बळी, नागरिकांना होणारा त्रास त्यांच्या संबंधातील हानी व जनजीवनावर होणारा त्रास आता थांबेल. मात्र भारताने या संबंधात स्पष्ट केलेले आहे की, जर पाकिस्ताच्या बाजूने घुसखोरी झाली, दहशतवादी हल्ले वा तत्सम घटना झाल्या, तर भारत चोख प्रत्युत्तर देईल. वेळप्रसंगी सर्जिकल स्ट्राईकही करील”.
शस्त्रसंधीमुळे तात्पुरती शांतता निर्माण झाली आहे, असेच म्हणावे लागेल. याचे कारण दहशतवादी हे पाकिस्तानचे एक शस्त्रच आहे. गेल्यावेळी २००३ मध्ये शस्त्रसंधी झाली होती. तर गेल्या दोन वर्षांमध्ये ५१३३ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले त्यात ४६ जवान आणि अधिकारी भारताला गमवावे लागले होते. गेल्या दोन महिन्यांमध्ये २९९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. त्यामुळे ही शस्त्रसंधी किती टिकेल हा ही प्रश्नच असल्याचे त्यांनी सांगितले.
“संयुक्त राष्ट्र संघाच्या एफएटीएफ अर्थातच फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने पाकिस्तानला अजूनही ग्रे यादीत ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून दहशतवाद्यांना होणारा आर्थिक पुरवठा रोखण्याचा हेतू आहे. भारताने विविध देशांची मदत घेऊन हे सारे घडवले आहे. यावेळी एफएटीएफन पाकिस्तानला काळ्या यादीत काही टाकलेले नाही. अर्थात पाकिस्तानसाठी याकरिता चीन व काही देशांनी मदत केल्याने ते ग्रे लिस्टमध्ये आहेत”, असेही महाजन म्हणाले.
ब्रह्मपुत्रा धरण बांधणार अशी बातमी ग्लोबल टाईम्सने दिली व भारतातील काही प्रसार माध्यमांनीही ते वृत्त दिले, मात्र त्यात तथ्य नाही. सरकारी स्तरावर तसे काही झालेले नाही. तसे झाले तर ब्रह्मपुत्रेचे पाणी भारतात येण्यापासून अडवले जाईल, असे वृत्त होते. त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या बैठकीत भारतात चीनचे शिपिंग येणार आहेत व त्यावेळी चीन- भारत यांच्यात आर्थिक करार केला जाईल, असे वृत्तही आहे, त्यातही तथ्य नसल्याचे यावेळी महाजन यांनी सांगितले.
“चीन भारताचा पहिला क्रमांकाचा शत्रू आहे हे नाकारता येत नाही. चीनने भारतात निर्यात मोठ्या प्रमाणात केली मात्र आता चीनकडून होणारी निर्यात कमी झाली. १९-२० अब्ज डॉलरचे सामान भारतात बनवले गेल्याने त्यांची भारताला होणारी निर्यात कमी झाली, भारतातून निर्यात वाढली आहे. आयात व निर्यात दोन्ही बाबी समान झाल्या तर भारत-चीन संबंध वाढू शकतात. या सर्वासाठी खरे म्हणजे आत्मनिर्भर भारतावर अधिक भर द्यायला हवा. त्यासाठी विविध स्तरावर युद्ध- संघर्ष करावा लागणार आहे”, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.