मुक्तपीठ टीम
कर्नाटक हे राज्य आधुनिक काळातील आयटी इंडस्ट्रीसाठी ओळखलं जातं, पण त्याच राज्यातील राजकारणात जात आणि धर्माचा प्रभाव प्रचंड आहे. त्यातही वेगवेगल्या जाती-पंथांच्या मठांच्या राजकीय भूमिकांवर निवडणुकीचे निकाल ठरत असल्याने महंतांचे महत्व कमालीचे वाढले आहे. कर्नाटकातील मठ, महंत आणि राजकारणात आता लैंगिक छळाचा अध्याय सुरु झाला आहे. त्यात एका महंतांना पोलिसांनी पॉक्सोखाली अटक केली आहे. तर त्यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रशासकीय अधिकारी माजी आमदारावरही असेच आरोप झाले आहेत, त्यांच्यावर महंतांविरोधात कटाचाही आरोप आहे. एकूणच निवडणूक जवळ आलेल्या या राज्यातीव वातावरण लैंगिक शोषणाच्या नव्या काळ्या अध्यायामुळे ढवळून निघालं आहे.
कर्नाटकात नेमकं काय घडलं?
- चित्रदुर्ग जिल्ह्यातील मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांना पोलिसांनी अटक केली आहे.
- कर्नाटकातील उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात त्यांचे नाव आहे.
- यामुळे त्यांना अटक झाली आहे.
- पोलिसांनी महंत आणि इतर चार जणांविरुद्ध पॉक्सो, अत्याचार प्रतिबंध कायदा आणि भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर सात दिवसांनी महंत यांना अटक करण्यात आली आहे.
- ते राज्यातील प्रमुख लिंगायत मठाचे धार्मिक नेते आहेत.
- त्यांच्यावर जानेवारी २०१९ ते जून २०२२ या कालावधीत त्याच शाळेत शिकणाऱ्या आणि वसतिगृहात राहणाऱ्या १५ आणि १६ वर्षांच्या दोन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.
महंत यांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येणार!
- एडीजीपी कायदा आणि सुव्यवस्था, आलोक कुमार यांनी सांगितले की, मुरुगा मठातील शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांना अटक केल्यानंतर न्यायाधीशांसमोर हजर केले जाईल. वैद्यकीय चाचणी केली जाईल.
- वकिलांच्या एका गटाने या प्रकरणाची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे.
- महंत यांच्या विरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांची राजकीय पक्षांनी जामीन अर्जाची सुनावणी स्थगित करण्याचा आदेश स्थानिक न्यायालयाने जारी केला.
महंतांविरोधात मठाचे प्रशासकीय अधिकारी?
- मठाचे प्रशासकीय अधिकारी एसके बसवराजन यांनी महंतांविरोधात कट रचल्याचा आरोप मठाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
- पण त्यांनी दावा केला की ते महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांच्याविरोधात कोणत्याही कटात सामील नव्हते.
- त्यांनी मुलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करून आपले कर्तव्य बजावले आहे.
- पहिल्यांदाच बसवराजन यांनी मौन तोडले आणि येत्या काही दिवसांत सर्वांना सर्व काही कळेल आणि मुले योग्य असतील तर त्यांना न्याय मिळेल असे सांगितले.
- लैंगिक अत्याचार आणि अपहरण प्रकरणात बसवराजन आणि त्यांच्या पत्नीला येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
- त्याच्याविरोधात एका महिलेने फिर्याद दिली असून तक्रारदार ही मठातील कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
- बसवराजन म्हणाले की, महंत आणि इतर चार जणांविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्यांबाबत त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीविरुद्धचा खटला पूर्णपणे खोटा आहे आणि उलट आरोप आहे.