Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना लस वाद : सीरम इंस्टिट्यूटकडून १००० कोटी नुकसानभरपाईची मागणी, उच्च न्यायालयाची नोटीस!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mumbai High Court And Covishield

मुक्तपीठ टीम

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट (SII) द्वारे निर्मित लस कोविशील्डमुळे महाराष्ट्रातील एका व्यक्तीने आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. त्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूटसह इतरांकडून जबाब मागवला आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्याने मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांना मुख्य प्रतिवादी बनवले आहे. याचिकाकर्त्याने मुलीच्या मृत्यूसाठी अँटी-कोरोनाव्हायरस लस कोविशील्डला जबाबदार धरत १००० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

मुलीच्या मृत्यूसाठी कोरोना लस जबाबदार असल्याचा आरोप!

  • दिलीप लुणावत यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि इतरांकडून उत्तर मागितले आहे.
  • ज्यामध्ये त्यांनी कोविशील्ड व्हॅक्सिनला त्यांच्या मुलीच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवले आहे.
  • लस कंपनीकडून १००० कोटी रुपये भरपाईची मागणी केली आहे.
  • याचिकाकर्ते दिलीप लुणावत यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनाही मुख्य लक्ष्य ठरवल आहे.
  • गेट्स फाउंडेशनने SII कंपनीसोबत भागीदारी केली होती.

नेमकं प्रकरण काय?

  • स्नेहल लुणावत ही वैद्यकीय विद्यार्थिनी होती
  • ती आरोग्य सेविका असल्याने तिला २८ जानेवारी २०२१ रोजी नाशिकमधील तिच्या महाविद्यालयात SII ने तयार केलेली कोरोना लस कोविशील्ड देण्यास आली होती.
  • कोविशील्ड लस घेतल्यानंतर काही दिवसांनी स्नेहलला तीव्र डोकेदुखी आणि उलट्या होऊ लागल्या आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले.
  • तेथे डॉक्टरांनी स्पष्ट केले की, त्याच्या मेंदूमध्ये गुठळ्या झाल्याचा त्रास होत आहे.
  • स्नेहलचा १ मार्च २०२१ रोजी मृत्यू झाला.
  • मृत्यूचे कारण लसीचा दुष्परिणाम असल्याचा दावा करण्यात आला आहे.
  • २६ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने याचिकेवर सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावल्या.
  • १७ नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Tags: • Bill Gatescovishieldmumbai high courtserum-instituteकोविशील्डबिल गेट्समहाराष्ट्र सरकारमुंबई उच्च न्यायालयसीरम इन्स्टिट्यूट
Previous Post

भाजपाचं मिशन २०२४: देशभरातील लाखो कमकुवत बूथचा शोध, बुथ मागे ३० सदस्यांचं लक्ष्य!

Next Post

कर्नाटकातील मठ, महंत आणि राजकारणातील लैंगिक छळाचा अध्याय! नेमकं काय घडलंय, काय बिघडतंय?

Next Post
Muruga Math Mahant Shivamurthy Muruga Sharanaru

कर्नाटकातील मठ, महंत आणि राजकारणातील लैंगिक छळाचा अध्याय! नेमकं काय घडलंय, काय बिघडतंय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!