मुक्तपीठ टीम
नील आयटीआर म्हणजे झिरो आयटी रिर्टन असं ही म्हणतात. जेव्हा कर सवलतीच्या मर्यादेचा प्रश्न येतो तेव्हा बरेच लोक त्यांच्यासाठी आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे की नाही याबद्दल शंखा व्यक्त करतात. सरकारच्या नियमांनुसार, ५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांकडून शून्य कर आकारला जातो असं म्हटलं असाताना काहींना प्रश्न पडतो की, आयकर रिटर्न भरायचा का नाही. तर, काही लोक असं मानतात की त्यांचा वार्षिक पगार २.५ लाखांपेक्षा कमी आहे त्यामुळे आयकर रिटर्न भरण्याची त्यांना गरज नाही. याची माहिती सविस्तर देण्यात आली आहे.
मूल्यांकन वर्ष २०२२-२३ किंवा आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ आहे. अशा परिस्थितीत, उत्पन्न गटात येणाऱ्या लोकांना अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. जर एकूण उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर आयटीआर भरणे आवश्यक आहे.
आयकर रिटर्न कोणी भरावा आणि कोणी नाही?
- जर तुमचे एकूण उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे.
- ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख आणि ८० वर्षांवरील लोकांसाठी ५ लाख आहे.
- जर तुमचे एकूण उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर आयटीआर भरण्याची गरज नाही. पण कमी पगार असूनही जर तुम्ही आयकर रिटर्न भरला तर त्याचे अनेक फायदेही आहेत.
झिरो आयटी रिटर्न भरण्याचे फायदे?
जर पगार २.५ लाखांपेक्षा कमी असेल तर, नील आयटी रिटर्न म्हणजेच झिरो आयटी रिटर्न भरता येतो. याचा फायदा असा की, तुम्हाला कर्जासाठी अर्ज करायचा असेल, मग ते गृहकर्ज असो, कार कर्ज असो किंवा वैयक्तिक कर्ज, बँक किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेकडून आयटी रिटर्न मागितले जाते आणि यावेळी आयटी रिटर्न सबमिट केले तर, कर्ज मंजूर करणे खूप सोपे होते.
करपात्र उत्पन्न ५ लाख रुपये असल्यास काय करावे?
- २.५ लाख रुपयांपर्यंत कमाई केल्यावर तुम्हाला रिबेट म्हणजेच आयकरातून सूट मिळते.
- जर, करपात्र उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर उर्वरित २.५ लाख रुपयांवर सूट मिळेल.
- जर तुमचे एकूण उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर आयटीआर भरणे आवश्यक आहे.
- आयटीआर न भरल्यास कोणतीही सूट मिळणार नाही, उलट तुम्हाला दंडही भरावा लागेल.