मुक्तपीठ टीम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयनं संजय पांडे यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नॅशनल स्टॅाक एक्स्चेंजच्या अधिकाऱ्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून तक्रार आल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी संजय पांडे आणि चित्रा रामकृष्ण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान को-लोकेशन घोटाळा फोन टॅपिंग प्रकरण आहे तरी काय? हे जाणून घेऊया.
काय आहे को-लोकेशन?
- शेअर ब्रोकर जेव्हा एक्स्चेंजमधील सर्व्हरची प्रॉक्सी बनवतात, तेव्हा ते एकाचवेळी दोन सर्व्हरवर काम करू शकतात.
- त्यासाठी काही अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
- याचा फायदा म्हणजे बाजारापूर्वी त्या प्रॉक्सी सर्व्हरवर संपूर्ण माहिती उपलब्ध होते.
- यातून ब्रोकर आणि व्यापारी प्रचंड नफा कमावतात.
- त्याच सर्व्हरमुळे डेटाचे प्रसारण जलद होते.
- ज्यांनी प्रॉक्सी सर्व्हरची सेवा घेतली आहे, त्यांना बाजाराशी संबंधित माहिती लवकर मिळते.
- ज्यांच्याकडे ही सुविधा नाही, त्यांना पाहिजे तसा फायदा होत नाही.
संजय पांडे यांच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात सीबीआय दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, कोटा, लखनौ, चंदीगड आणि इतर शहरांमध्ये १८ ठिकाणी छापे टाकले आहे. इतर काही कंपन्यांसह NSE चे सिक्युरिटी ऑडिट करणाऱ्या Isec Securities Private Limited ने २००९ ते २०१७ या वर्षात NSE कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप आहे. या कामासाठी या खासगी कंपनीला सुमारे ४.४५ कोटी रुपये अदा करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणी संजय पांडे आणि चित्रा रामकृष्ण यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ती कंपनी पांडे यांची…
- संजय पांडे यांनी २००१ मध्ये पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिला आणि आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी सुरू केली.
- मात्र त्यावेळी तांत्रिक कारणामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही.
- २००६ मध्ये संजय पांडेंनी त्यांच्या आई व मुलाला आपल्या कंपनीत संचालकपद दिले.
संजय पांडेंची चौकशी का?
- संजय पांडे हे २००३ पासून या कंपनीचे पूर्णवेळ संचालक आहेत.
- या कंपनीवर एनएसईने २०१० ते २०१५ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सॉफ्टवेअरसंबंधित लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपविली होती.
- सर्व्हरमध्ये फेरफार होऊनही त्याबाबतची कल्पना लेखापरीक्षण कंपनीला कशी मिळाली नाही? की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
- संजय पांडेंनी संचालक पद सोडल्याचं सांगितलं असलं तरी त्यामुळे त्यांची जबाबदारी संपत नाही, असंही सांगितलं जातं.