Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संजय पांडेंना अडचणीत आणणारे NSE को-लोकेशन घोटाळा फोन टॅपिंग प्रकरण आहे तरी काय?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sanjay pandey

मुक्तपीठ टीम

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयनं संजय पांडे यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नॅशनल स्टॅाक एक्स्चेंजच्या अधिकाऱ्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून तक्रार आल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी संजय पांडे आणि चित्रा रामकृष्ण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान को-लोकेशन घोटाळा फोन टॅपिंग प्रकरण आहे तरी काय? हे जाणून घेऊया.

काय आहे को-लोकेशन?

  • शेअर ब्रोकर जेव्हा एक्स्चेंजमधील सर्व्हरची प्रॉक्सी बनवतात, तेव्हा ते एकाचवेळी दोन सर्व्हरवर काम करू शकतात.
  • त्यासाठी काही अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
  • याचा फायदा म्हणजे बाजारापूर्वी त्या प्रॉक्सी सर्व्हरवर संपूर्ण माहिती उपलब्ध होते.
  • यातून ब्रोकर आणि व्यापारी प्रचंड नफा कमावतात.
  • त्याच सर्व्हरमुळे डेटाचे प्रसारण जलद होते.
  • ज्यांनी प्रॉक्सी सर्व्हरची सेवा घेतली आहे, त्यांना बाजाराशी संबंधित माहिती लवकर मिळते.
  • ज्यांच्याकडे ही सुविधा नाही, त्यांना पाहिजे तसा फायदा होत नाही.

संजय पांडे यांच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात सीबीआय दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, कोटा, लखनौ, चंदीगड आणि इतर शहरांमध्ये १८ ठिकाणी छापे टाकले आहे. इतर काही कंपन्यांसह NSE चे सिक्युरिटी ऑडिट करणाऱ्या Isec Securities Private Limited ने २००९ ते २०१७ या वर्षात NSE कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप आहे. या कामासाठी या खासगी कंपनीला सुमारे ४.४५ कोटी रुपये अदा करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणी संजय पांडे आणि चित्रा रामकृष्ण यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ती कंपनी पांडे यांची…

  • संजय पांडे यांनी २००१ मध्ये पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिला आणि आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी सुरू केली.
  • मात्र त्यावेळी तांत्रिक कारणामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही.
  • २००६ मध्ये संजय पांडेंनी त्यांच्या आई व मुलाला आपल्या कंपनीत संचालकपद दिले.

संजय पांडेंची चौकशी का?

  • संजय पांडे हे २००३ पासून या कंपनीचे पूर्णवेळ संचालक आहेत.
  • या कंपनीवर एनएसईने २०१० ते २०१५ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सॉफ्टवेअरसंबंधित लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपविली होती.
  • सर्व्हरमध्ये फेरफार होऊनही त्याबाबतची कल्पना लेखापरीक्षण कंपनीला कशी मिळाली नाही? की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
  • संजय पांडेंनी संचालक पद सोडल्याचं सांगितलं असलं तरी त्यामुळे त्यांची जबाबदारी संपत नाही, असंही सांगितलं जातं.

Tags: CBIco-location scamSanjay Pandeको-लोकेशनसंजय पांडेसीबीआय
Previous Post

‘हर घर तिरंगा’ अभियानात मुख्य सचिवांचं लोकसहभागाचं आवाहन

Next Post

समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
Sankalp Se siddhi

समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!