मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता लवकरच ५-जी स्पेक्ट्रम लिलाव होणार आहे. त्यामुळे यंदा दिवाळीपर्यंत लोकांना ५-जी सेवेची भेट मिळू शकते. त्यामुळे देशातील इंटरनेट सेवा अधिक वेगवान होणार आहे. ५-जी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची प्रक्रिया या वर्षी जुलै महिन्यापर्यंत पूर्ण होईल. या वर्षाच्या अखेरीस भारतातील २० ते २५ मोठ्या शहरांमध्ये ५-जी सेवा सुरू होईल. पहिल्या टप्प्यातील १३ मोठ्या शहारांमध्ये मुंबई, पुण्याचा समावेश आहे.
५-जी ४-जी पेक्षा जास्त महाग!
- भारतात सरासरी इंटरनेटची किंमत सुमारे १५५ रुपये असेल.
- जागतिक सरासरी दर १९०० रुपयांच्या असू शकतो.
- एअरटेलचे सीटीओ रणदीप सेखॉन यांनी ५-जी च्या किमती स्पष्ट करताना सांगितले की ५-जी ४-जी पेक्षा खूप जास्त महाग होणार नाही.
- लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्या किमतीही समोर येतील.
या शहरांमध्ये उपलब्ध होणार प्रथम ५-जी सेवा
सरकारने १३ शहरांची नावे जाहीर केली आहेत, ज्यांना भारतात ५-जी सेवांची सुविधा दिली जाणार आहे.
- मुंबई
- पुणे
- दिल्ली
- हैदराबाद
- बंगळुरू
- चेन्नई
- लखनौ
- गांधीनगर
- जामनगर
- अहमदाबाद
- चंदीगड