मुक्तपीठ टीम
औषध कंपन्याच्या आमिषाला बळी पडून महागडी ब्रँडेड औषधं रुग्णांना विकणाऱ्या डॉक्टरांना आता चाप बसणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) डॉक्टरांसाठीच्या व्यावसायिक आचारसंहितेत बदल केला आहे. आता डॉक्टरांना महागडी ब्रँडेड औषधे रुग्णांना विकता येणार नाहीत. असं असलं तरीही डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांसाठी औषधे विकण्यास पूर्णपणे मनाई नाही.
एनएमसीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आचारसंहितेच्या मसुद्यानुसार, डॉक्टर औषधांची दुकाने काढू शकत नाही आणि वैद्यकीय उपकरणेही विकू शकत नाहीत. ते त्यांच्याकडे उपचार करत असलेल्यांनाच औषधे विकू शकतात, परंतु रुग्णांना याचा त्रास होणार नाही याची त्यांना काळजी घ्यावी लागेल.
स्वातंत्र्यापूर्वी केलेल्या सर्व कायद्यांमध्ये डॉक्टरांना रुग्णांना औषधे देण्याची मुभा आहे.
- तेव्हा औषधांची दुकाने कमी होती.
- जागतिक आरोग्य संघटना देखील यासाठी परवानगी देते.
- डॉक्टर घरी गेल्यावरही रुग्णावर उपचार करत असल्याने ही तरतूद करण्यात आली.
- नंतर मेडिकल स्टोअर्स वाढल्याने मोठ्या शहरांमध्ये स्वतःची औषधे विकण्याची प्रथा कमी झाली.
- लहान शहरांमध्येही डॉक्टर रुग्णांना बघून औषधांची विक्री करतात.
डॉक्टरांनी औषधे विकणे योग्य नाही…
- डॉक्टरांकडून औषधे विकणे हे अयोग्य आहे, असे एका वर्गाचे मत आहे.
- कारण डॉक्टर महागडी ब्रँडेड औषधेच ठेवतात आणि रुग्णांना ती घ्यावी लागतात.
- तर, मेडिकल स्टोअरमध्ये जेनेरिक औषधे खरेदी करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
कोणताही डॉक्टर इतर डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध विकू शकत नाही!!
- एखाद्या रोगासाठी पाच औषधे असतील आणि डॉक्टरकडे कमी परिणामकारक औषध असेल तर तो त्याची विक्री वाढवण्यासाठी तेच औषध लिहून देवू शकतो.
- मात्र, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णाला औषध विकले तर रुग्णाचा वेळ वाचेल. कोणत्याही डॉक्टरला इतर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे विकता येणार नाहीत, असे एनएमसीने मसुद्यात म्हटले आहे. तो फक्त जेनेरिक औषधे लिहून देईल आणि विकेल.
वैद्यकीय आयोगाच्या आचारसंहितेतील नव्या तरतुदी…
- पत्रकावर नोंदणी क्रमांक लिहिणे बंधनकारक असेल
- उपचार शुल्क आगाऊ नमूद करणे आवश्यक आहे
- धर्माच्या आधारावर उपचार नाकारू शकत नाही
- नसबंदीच्या बाबतीत जोडीदाराची परवानगी घ्यावी लागेल.
- वैद्यकीय विद्यार्थ्यांना सांगावे लागेल की ते विद्यार्थी आहेत, डॉक्टर नाहीत.