Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

पावसाळ्यात नवी मुंबई – पनवेलसाठी सिडकोचा खास २४X७ आपत्कालीन नियंत्रण कक्ष

June 2, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
cidco

मुक्तपीठ टीम

सिडको महामंडळाचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष १ जून ते ३० सप्टेंबर २०२२ या पावसाळी कालावधीमध्ये २४ x ७ तत्त्वावर कार्यरत असणार आहे. दरवर्षी पावसाळी कालावधीमध्ये सिडकोतर्फे नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येतो. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्ती/दुर्घटना लक्षात घेता जून ते सप्टेंबर या कालावधीत सिडकोचा सुसज्ज असा आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत असतो.

सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन इमारतीच्या तळ मजल्यावर असलेला हा नियंत्रण कक्ष कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसहित शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही २४ तास कार्यरत राहणार आहे. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग आदी महत्त्वाच्या विभागाचे कर्मचारी २४ तास संपर्कात असतील.
सिडकोच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाद्वारे वृक्षांची पडझड/वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी, रस्त्यावरील उघड्या गटारांची झाकणे पूर्ववत बसवणे, पूर/पूरसदृश परिस्थिती, रस्त्यांवरील खड्डे, रस्ते वानाल्याजवळ साचलेला कचरा, व्यक्तींचे पाणीसाठ्याच्या ठिकाणी बुडणे, आग व आगीचे विविध प्रकार, साथीचे रोग, विषारी प्राणी चावण्यासंबंधी बाबी, इमारत कोसळणे, भूस्खलन, पाणी साचणे या आपत्तींची दखल घेण्यात येऊन त्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येईल.

नागरिकांनी वरीलपैकी कोणतीही आपत्ती उद्भवल्यास पुढे देण्यात आलेल्या दूरध्वनी अथवा व्हॉटसॲप
क्रमांकावर किंवा ई-मेलद्वारे सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून आपत्तीसंबंधी माहिती द्यावी
किंवा त्याबाबतची तक्रार नोंदवावी.

  • दूरध्वनी क्र. ०२२-६७९१ ८३८३/८३८४/८३८५, २७५६२९९९
  • टोल फ्री क्र. १८००२२६७९१
  • व्हॉटसॲप क्र. ८८७९४५०४५०
  • फॅक्स क्र. ०२२-६७९१८१९९
  • ई-मेल eoc@cidcoindia.com

पनवेल महानगरपालिकेला हस्तातंरीत केलेल्या क्षेत्रासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक :

  • दूरध्वनी क्र. ०२२-२७४६१५००/२७४५८०४०/४१/४२
  • टोल फ्री क्र. १८००२७७०१
  • व्हॉटसअॅप क्र. ९७६९०१२०१२

नागरिकांमार्फत फोनवरून अथवा व्हॉट्‌सॲपवरून माहिती अथवा तक्रार प्राप्त झाल्यावर नियंत्रण कक्षातील अधिकारी तातडीने निर्णय घेऊन ज्या नोडमध्ये सदर घटना घडली असेल तेथील प्रमुख अधिकाऱ्यास घटनेसंबंधी माहिती कळवतील व त्यासंबंधी योग्य ते मार्गदर्शन करतील. तसेच नियंत्रण कक्ष आवश्यक असलेल्या अग्निशमन केंद्र, हॉस्पिटल, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस अशा संबंधित विभागाशी तातडीने संपर्क साधून घटनास्थळी आवश्यक ती मदत ताबडतोब पोहोचविण्याची दक्षता घेईल. नागरी संरक्षण दल तसेच सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक यांचेही सहकार्य याकामी घेण्यात येणार आहे. नोडल अधिकारी, सर्व संबंधित सिडकोचे विभाग, तसेच इतर शासकीय विभाग यांच्याशी समन्वय साधण्याची महत्वाची भूमिका हा नियंत्रण कक्ष पार पाडेल. त्या घटनेसंबंधी केलेल्या कारवाईची माहिती व सद्यस्थिती नोडल अधिकारी नियंत्रण कक्षास पुरवणार आहेत. सदर माहिती नियंत्रण कक्षाकडून संपर्क साधलेल्या नागरिकांना दिली जाईल.

दगडखाणी आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागांवर धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यात येणार आहेत. अपघातप्रवण जागांवर सिडकोचे सुरक्षा रक्षक तैनात ठेवले जाणार आहेत. तसेच धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे. अतिवृष्टीच्या वेळी पाणी साठल्यास पाण्याचा उपसा करणारी यंत्रसामुग्री २४ तास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: CIDCOgood newsmuktpeethNavi Mumbai-PanvelSpecial 24X7 Emergency Control Roomचांगली बातमीनवी मुंबईमुक्तपीठसिडको महामंडळसीबीडी बेलापूर
Previous Post

दिल्लीच्या दृष्टिहीन शिक्षिकेची भरारी, UPSC परीक्षा उत्तीर्ण केली!

Next Post

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत १९५ जागांवर नोकरीची संधी

Next Post
mscbank

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत १९५ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!