मुक्तपीठ टीम
वळणा-वळणाचे रस्ते…एका बाजूला उंचच उंच गेलेल्या पर्वतरांगा…दुसऱ्या बाजूला तेवढ्याच खोल दऱ्या. हे सारं मागे टाकत एक वळण येतं तिथंच काला टॉप खज्जियार अभयारण्याची सुरुवात होते. ज्याला कालाटॉप वन्यजीव अभयारण्य म्हणूनही ओळखले जातं. ते हिमाचल प्रदेशातील डलहौसीच्या प्रमुख पर्यटन स्थळांमधील एक महत्वाचं स्थान आहे.
कालाटोप नावाचा अर्थ ‘ब्लॅक हॅट’ असा आहे. या अभयारण्यातील सर्वात उंच टेकडीवरील घनदाट जंगलात दिवसाही असणारा काहीशा अंधारामुळे ते नाव पडले असावे. कालाटॉपच्या परिसरात अनेक प्रकारच्या वनस्पती आणि वन्यजीवसंपदा आहे. कालाटोपचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना खूप आकर्षित करते.
तेथे पर्यटकांचे पाय कालाटोपकडे ट्रेकिंगसाठी वळतातच वळतात. डोंगरातील पायवाटांवरून पर्यटक ट्रेकिंग करतात. हे अभयारण्य ट्रेकिंगसाठी चांगले ठिकाण आहे. घरातील लोक आणि मित्रपरिवारासह ज्यांना त्यांचे कुटुंब आणि मित्रांसह काही दर्जेदार वेळ घालवायचा आहे. सभोतालच्या हिरवाईत एक वेगळा अनुभव घेत पर्यटक वरच्या भागाकडे सरसावतात.
तिथं पोहचल्यावर ट्रेकिंगचा एक टप्पा संपलेला असला तरी पर्यटकांचे आनंदाचे क्षण मात्र वाढतेच असतात. कारण तिथंही निसर्ग सौंदर्य एका नव्या उंचीवर पोहचत असतं…
कालाटॉप खज्जियार अभयारण्यातील वनस्पती आणि प्राणी
कालाटॉप खज्जियार अभयारण्यात विविध प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आढळतात. अभयारण्यात आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये काळे अस्वल, हिमालयीन ब्लॅक मार्टेन, जंगली मांजरी, हरिण, बार्किंग गोरल, बिबट्या, सेरो (शेळीसारखे/मृगासारखे सस्तन प्राणी) इत्यादी काही नावे आहेत. पक्षीतज्ज्ञांसाठी हे अभयारण्य जणू स्वर्गच आहे. युरेशियन ज्यू, चेस्टनट-बिल्ड थ्रश, फिजंट, हिमालयन मोनाल, ब्लॅकबर्ड, ग्रे-हेडेड कॅनरी इत्यादी पक्षी प्रजातींचे अनेक पक्षी येथे आढळतात.
कालाटॉप खज्जियार अभयारण्याला भेट देताना ही काळजी घ्या!
- या भागात प्रवास करताना अस्वलापासून सावध रहा.
- येथे एकट्याने ट्रेकिंग केल्यापेक्षा स्थानिक गाइड सोबत घ्या, ते माहितीही देतात आणि अस्वलासारख्या हल्ल्यातून सुरक्षितही ठेवतात.
- रात्री दुर्बीण सोबत ठेवा.
- कालाटॉप खज्जियार अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे मार्च ते मे या उन्हाळ्यात.
- जुलै हा पावसाचा महिना आहे. तर त्यानंतर बर्फाचे दिवस सुरु होतात.