Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिमाचलमधील निसर्गाच्या सहवासात ट्रेकिंगची संधी…कालाटॉप खज्जियार अभयारण्य!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, निसर्ग
0
kala top

मुक्तपीठ टीम

वळणा-वळणाचे रस्ते…एका बाजूला उंचच उंच गेलेल्या पर्वतरांगा…दुसऱ्या बाजूला तेवढ्याच खोल दऱ्या. हे सारं मागे टाकत एक वळण येतं तिथंच काला टॉप खज्जियार अभयारण्याची सुरुवात होते. ज्याला कालाटॉप वन्यजीव अभयारण्य म्हणूनही ओळखले जातं. ते हिमाचल प्रदेशातील डलहौसीच्या प्रमुख पर्यटन स्थळांमधील एक महत्वाचं स्थान आहे.

कालाटोप नावाचा अर्थ ‘ब्लॅक हॅट’ असा आहे. या अभयारण्यातील सर्वात उंच टेकडीवरील घनदाट जंगलात दिवसाही असणारा काहीशा अंधारामुळे ते नाव पडले असावे. कालाटॉपच्या परिसरात अनेक प्रकारच्या वनस्पती आणि वन्यजीवसंपदा आहे. कालाटोपचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना खूप आकर्षित करते.

तेथे पर्यटकांचे पाय कालाटोपकडे ट्रेकिंगसाठी वळतातच वळतात. डोंगरातील पायवाटांवरून पर्यटक ट्रेकिंग करतात. हे अभयारण्य ट्रेकिंगसाठी चांगले ठिकाण आहे. घरातील लोक आणि मित्रपरिवारासह ज्यांना त्यांचे कुटुंब आणि मित्रांसह काही दर्जेदार वेळ घालवायचा आहे. सभोतालच्या हिरवाईत एक वेगळा अनुभव घेत पर्यटक वरच्या भागाकडे सरसावतात.

तिथं पोहचल्यावर ट्रेकिंगचा एक टप्पा संपलेला असला तरी पर्यटकांचे आनंदाचे क्षण मात्र वाढतेच असतात. कारण तिथंही निसर्ग सौंदर्य एका नव्या उंचीवर पोहचत असतं…

कालाटॉप खज्जियार अभयारण्यातील वनस्पती आणि प्राणी

कालाटॉप खज्जियार अभयारण्यात विविध प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आढळतात. अभयारण्यात आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये काळे अस्वल, हिमालयीन ब्लॅक मार्टेन, जंगली मांजरी, हरिण, बार्किंग गोरल, बिबट्या, सेरो (शेळीसारखे/मृगासारखे सस्तन प्राणी) इत्यादी काही नावे आहेत. पक्षीतज्ज्ञांसाठी हे अभयारण्य जणू स्वर्गच आहे. युरेशियन ज्यू, चेस्टनट-बिल्ड थ्रश, फिजंट, हिमालयन मोनाल, ब्लॅकबर्ड, ग्रे-हेडेड कॅनरी इत्यादी पक्षी प्रजातींचे अनेक पक्षी येथे आढळतात.

कालाटॉप खज्जियार अभयारण्याला भेट देताना ही काळजी घ्या!

  • या भागात प्रवास करताना अस्वलापासून सावध रहा.
  • येथे एकट्याने ट्रेकिंग केल्यापेक्षा स्थानिक गाइड सोबत घ्या, ते माहितीही देतात आणि अस्वलासारख्या हल्ल्यातून सुरक्षितही ठेवतात.
  • रात्री दुर्बीण सोबत ठेवा.
  • कालाटॉप खज्जियार अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे मार्च ते मे या उन्हाळ्यात.
  • जुलै हा पावसाचा महिना आहे. तर त्यानंतर बर्फाचे दिवस सुरु होतात.

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsHimachalHimachal NatureKalatop Khajjiar SanctuarymuktpeethTrekkingकालाटॉप खज्जियार अभयारण्यचांगली बातमीट्रेकिंगमुक्तपीठहिमाचलहिमाचल निसर्ग
Previous Post

राज्यात ५५० नवे रुग्ण, ३२४ बरे! मुंबई ३७५, पुणे ४९, ठाणे ७१

Next Post

थाटामाटात पार पडला दिव्यांगांचा विवाह सोहळा! सक्षम पुणे महानगरचा पुढाकार

Next Post
pune

थाटामाटात पार पडला दिव्यांगांचा विवाह सोहळा! सक्षम पुणे महानगरचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!