मुक्तपीठ टीम
राजर्षी शाहू महाराज स्मृती जन्मशताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनास कोल्हापूरवासियांनी उदंड प्रतिसाद दिला. दि २८ ते ३० एप्रिल या कालावधीत संपन्न झालेल्या या ग्रंथप्रदर्शनाचे, कोल्हापुरातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक किरण गुरव आणि सोनाली नवांगुळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी .टी शिर्के, विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, हे ग्रंथप्रदर्शन सर्वांसाठी खुले असून शाहू महाराजां बद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे.जिल्हावासियांनी या ग्रंथप्रदर्शनाला भेट देवून याचा लाभ घ्यावा तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेले विशेष ग्रंथ प्रदर्शन वाचकांसाठी एक पर्वणी ठरणार असून करवीरवासियांनी त्याला, ‘ न भूतो न भविष्यते ‘ असा प्रतिसाद द्यावा . असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी केले.
उद्घाटनानंतर कुलगुरू डॉ. शिर्के व जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासह मान्यवरांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या विविध ग्रंथ प्रकाशक व वितरकांच्या स्टॉल्सची पाहणी करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन व कार्यावरील ११० ग्रंथांचे शिवाजी विद्यापीठाचे विशेष दालन तर करवीर नगर वाचन मंदिरातील महाराजांवरील ४० पुस्तके हे या प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्य होते.
पाहा व्हिडीओ: