Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ बनली तिचाकी विद्युत वाहनांमधील भारतातील पहिल्या क्रमांकाची कंपनी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Mahindra Electric

मुक्तपीठ टीम

महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या ‘महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड’ ही कंपनी भारतातील तिचाकी विद्युत वाहनांच्या बाजारात पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे. या कंपनीने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ७३.४ टक्के इतका बाजारपेठेतील हिस्सा मिळवला. त्यामुळे ही तिचाकी विद्युत वाहनांच्या उत्पादनामध्ये देशात अग्रगण्य ठरली आहे.

आर्थिक वर्ष २१पासून या कंपनीने तब्बल २१४ टक्के इतकी वाढ साधली आहे. विविध ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘महिंद्र इलेक्ट्रिक’कडे ‘ट्रिओ ऑटो’, ‘ट्रिओ यारी’, ‘ट्रिओ जोर’, ‘ई-अल्फा मिनी’ आणि ‘ई-अल्फा कार्गो’ अशा तिचाकी विद्युत वाहनांचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे. सादर झाल्यापासून १८ हजारांपेक्षा जास्त विक्रीचा टप्पा पार करणारा, लिथियम आयन बॅटरी असलेला, ‘ट्रिओ’ हा तिचाकी विद्युत वाहनांचा देशातील पहिला प्लॅटफॉर्म आहे.

‘महिंद्राच्या’ अखेरच्या टप्प्यापर्यंत पोहोचणाऱ्या उत्पादनांनी एकत्रितपणे ४२.७ कोटी किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे आणि ४२,८३५ मेट्रिक टनपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन वाचवले आहे.
‘महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा म्हणाल्या, “गेल्या वर्षभरात आम्ही आमच्या ईव्ही फूटप्रिंटचा लक्षणीय विस्तार केला आणि प्रदूषण कमी केले, याचा मला आनंद आहे (अन्यथा २० लाख झाडे लावायला लागली असती). यातून आम्ही सरकारच्या शाश्वत विकासाच्या धोरणाला हातभार लावला आहे. या यशात आमचे सर्व भागधारक सहभागी आहेत. ‘लास्ट माइल मोबिलिटी स्पेस’मध्ये अनेक रोमांचक उत्पादने आणि सोल्यूशन्स सादर करून आर्थिक वर्ष २३मध्येदेखील ही गती कायम ठेवता येईल, अशी आम्हाला आशा आहे.”

‘ट्रिओ ऑटो’ ही पॅसेंजर श्रेणीतील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर आहे. बाजारात तिचा हिस्सा ७०.४ टक्के इतका आहे. ‘ट्रिओ जोर’ मालवाहू विभागात आघाडीवर आहे आणि तिचा बाजारातील हिस्सा ५२.१ टक्के आहे. पेट्रोल / डिझेल / सीएनजीच्या सतत वाढणाऱ्या किमती, प्रगत लि-आयन तंत्रज्ञान आणि सरकारची अनुकूल धोरणे यांमुळे या वाहनांचा खप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या वाहनांमुळे लक्षणीय बचत साध्य होत असल्याने ग्राहक आमच्या वाहनांना प्राधान्य देतात. विद्युत वाहनांची उच्च स्वरुपाची विश्वासार्हता, आमचे विस्तृत सर्व्हिस नेटवर्क आणि आक्रमक मार्केटिंग व विक्रीचे धोरण यांचाही या यशात हातभार लागला आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: electric vehiclegood newsIndiaMahindra ElectricMahindra Electric Mobility Limitedmahindra groupMahindra Trio Automuktpeethचांगली बातमीभारतमहिंद्रा इलेक्ट्रिक तिचाकीमहिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडमहिंद्रा ग्रुपमहिंद्रा ट्रिओ ऑटोमुक्तपीठविद्युत वाहन
Previous Post

राजर्षी शाहू महाराज स्मृती जन्मशताब्दी कृतज्ञता पर्वात ग्रंथ प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद

Next Post

नागपूर महानगरपालिकेत ‘अर्बन डिझायनर’ पदावर करिअर संधी

Next Post
nmc

नागपूर महानगरपालिकेत 'अर्बन डिझायनर' पदावर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!